AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नो-कॉस्ट EMI म्हणजे काय? विनाव्याज बेनिफिट्स मिळतात का? जाणून घ्या

नो-कॉस्ट EMI मध्ये कोणत्याही व्याजाशिवाय EMI वर वस्तू खरेदी करू शकतात. पण, हे खरोखर फायदेशीर आहे. चला जाणून घेऊया.

नो-कॉस्ट EMI म्हणजे काय? विनाव्याज बेनिफिट्स मिळतात का? जाणून घ्या
No Cost EMIImage Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Sep 05, 2025 | 3:58 PM
Share

आज आम्ही तुम्हाला नो-कॉस्ट ईएमआविषयी माहिती देणार आहोत. नो-कॉस्ट ईएमआयमध्ये, खरेदीदार कोणत्याही व्याजाशिवाय ईएमआयवर वस्तू खरेदी करू शकतात. याचाच अर्थ असा की,. एक प्रकारचे व्याजरहित कर्ज, परंतु नो-कॉस्ट ईएमआय खरेदीदारांसाठी खरोखर फायदेशीर आहे. याविषयी तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर पुढे जाणून घेऊया.

येत्या काही महिन्यांत दिवाळीचा सण येत आहे. लोक आता आपल्या घरासाठी नवीन वस्तू खरेदी करतील. काही लोक टीव्ही, लॅपटॉप सारख्या वस्तू खरेदी करतील तर काही लोक स्मार्टफोनही खरेदी करतील. दिवाळीमुळे दुकानांमध्ये ग्राहकांना अनेक प्रकारच्या ऑफर्स दिल्या जातात. यापैकी एक ऑफर म्हणजे नो-कॉस्ट ईएमआय.

नो-कॉस्ट ईएमआयमध्ये व्याजाशिवाय ईएमआयवर वस्तू खरेदी करू शकतात. हे एक व्याजरहित कर्ज आहे. पण, नो-कॉस्ट ईएमआय खरेदीदारांसाठी खरोखर फायदेशीर आहे. याविषयी जाणून घेऊया.

नो-कॉस्ट ईएमआय किती फायदेशीर आहे?

नो-कॉस्ट ईएमआय म्हणजे कोणत्याही व्याजाशिवाय EMI पण वास्तव काही औरच आहे. खरं तर नो-कॉस्ट ईएमआय एक प्रकारे ग्राहकांना आकर्षित करते. नो-कॉस्ट ईएमआयमध्ये प्रॉडक्टच्या किमतीतच व्याज अॅडजस्ट केलं जातं आणि कोणत्याही व्याजाशिवाय ईएमआयचा फायदा मिळाल्याचं ग्राहकांना वाटतं. उदाहरणाने समजून घेऊया. समजा तुम्ही नो-कॉस्ट ईएमआयवर 50,000 रुपयांचे प्रॉडक्ट खरेदी केले आहे. जर या प्रॉडक्टची ईएमआयवर एकूण 55000 रुपयांची किंमत येत असेल तर तुम्हाला वाटेल की कंपनी 5000 चा खर्च उचलत आहे पण प्रत्यक्षात तसे नाही. खरं तर 5000 रुपयांच्या प्रॉडक्टवर ही सूट असेल, जी कंपनी तुम्हाला देणार नाही.

नो-कॉस्ट ईएमआयच्या पार्श्वभूमीवर अनेकदा कंपन्या उत्पादनावर मिळणारे कॅशबॅक, कूपन आणि इतर ऑफर्स लपवतात. याशिवाय अनेक बँका उत्पादनाच्या किंमतीत ही वाढ करतात.

‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

तुम्ही नो-कॉस्ट ईएमआयवर प्रॉडक्ट घेत असाल तर आधी त्या प्रॉडक्टची एमआरपी आणि सेलिंग प्राइस तपासा, म्हणजेच तुम्हाला प्रॉडक्टची जास्त किंमत सांगितली जात नाही ना, हे तपासा. याशिवाय वेगवेगळ्या कंपन्यांनी दिलेल्या ऑफर्सची तुलना करा आणि तुम्हाला डायरेक्ट डिस्काउंट मिळत आहे की नो-कॉस्ट ईएमआय हे बघा.

( डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.