
पंजाबी गायक शुभदीप सिंह ऊर्फ सिद्धू मूसेवाला यांची 29 मे 2022 रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. सिद्धू त्यांच्या आई-वडीलांचा एकलुता एक मुलगा होता. त्यामुळे त्यांच्या वयस्कर आई-वडीलांनी एवढ्या संपत्तीचे काय करायचे म्हणून या वयात कृत्रिम गर्भधारणेद्वारे मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. भारतात एवढ्या जास्त वयात सरोगसी मदरचा कायदा परवानगी देत नाही. म्हणून त्यांनी आयव्हीएफ ( IVF ) तंत्राद्वारे लंडनमध्ये जाऊन कृत्रिम गर्भधारणा केली. त्यानंतर भारतात येऊन बठिंडा येथील हॉस्पिटलमध्ये सिद्धू यांच्या 58 वर्षीय माता चरण कौर यांनी मुलाला जन्म दिला आहे. वाहेगुरुच्या आशीर्वादाने शुभच्या छोट्या भावाला आमच्या पदरात टाकले आहे अशी प्रतिक्रिया सिद्धूचे वडील बलकौर सिंह यांनी दिली आहे. या वयात मुलाला जन्म घातल्याने सिद्धूच्या वयस्कर आई-वडीलांना पोलिसांच्या चौकशीच्या फेऱ्यांना देखील सामोरे जावे लागले आहे. या निमित्ताने पुन्हा सरोगसी कायदा चर्चेत आला आहे. काय आहे हा कायदा ? आणि त्याचे सामाजिक परिणाम काय ते पाहूयात…. ...