KGF: रेकॉर्डब्रेक कमाई करणाऱ्या KGF च्या खऱ्या खाणीची कहाणी; जिथून निघालं होतं तब्बल 900 टन सोनं

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Apr 19, 2022 | 10:45 AM

नुकताच KGF चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला, जो बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कलेक्शन करत आहे. सुपरस्टार यशाच्या KGF चित्रपटात दाखवण्यात आलेल्या खाणीची कथा काय आहे, येथे सोन्याची खाण कशी सुरू झाली आणि आज तिची स्थिती काय आहे? जाणून घ्या या प्रश्नांची उत्तरे..

KGF: रेकॉर्डब्रेक कमाई करणाऱ्या KGF च्या खऱ्या खाणीची कहाणी; जिथून निघालं होतं तब्बल 900 टन सोनं
Story of KGF
Image Credit source: Tv9

KGF च्या पहिल्या भागापासूनच प्रेक्षक त्याच्या सीक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते. अलीकडेच त्याचा सिक्वेल KGF Chapter 2 (KGF-2) रिलीज झाला. हा चित्रपट विक्रम करत आहे. आतापर्यंत जवळपास 200 कोटींची कमाई झाली आहे. KGF चे पूर्ण नाव कोलार गोल्ड फील्ड्स (Kolar Gold Fields) आहे. सुपरस्टार यशचा हा चित्रपट कर्नाटकातील कोलार येथील सोन्याच्या खाणीवर आधारित आहे. ही अशी खाण आहे जिथे एकेकाळी लोक हाताने खणून सोने काढायचे. 121 वर्षांच्या इतिहासात या खाणीतून सुमारे 900 टन सोने काढण्यात आले आहे. सुपरस्टार यशच्या KGF या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या त्या खाणीची कथा (story of mine) काय आहे, येथे सोन्याची खाण कशी सुरू झाली आणि आज तिची स्थिती काय आहे? या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला येथे मिळेल.

सर्वात खोल सोन्याची खाण

चित्रपटात दाखवण्यात आलेली जगातील दुसरी सर्वात खोल सोन्याची खाण कर्नाटकातील कोलार जिल्ह्याच्या मुख्यालयापासून 30 किमी अंतरावर असलेल्या रॉबर्टसनपेट नावाच्या तहसीलमध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेच्या पोनेंग सोन्याच्या खाणींनंतर कोलार गोल्ड फील्ड्स ही जगातील दुसरी सर्वात खोल खाण म्हणून गणली जाते. या खानबद्दल अनेक कथा होत्या. ते ऐकून ब्रिटीश सरकारचे लेफ्टनंट जॉन वॉरन येथे पोहोचले. KGF चे सत्य जाणून घेण्यासाठी जॉनने गावकऱ्यांना आव्हान दिले. तो म्हणाला, जो कोणी खाणीतून सोने काढून, दाखवेल त्याला बक्षीस मिळेल.

बैलगाडीत भरली माती

बक्षीस मिळवण्याच्या इच्छेने गावकऱ्यांनी खाणीची माती, बैलगाडीत भरली आणि जॉनपर्यंत पोहोचले. जॉनने मातीचे परीक्षण केले तेव्हा त्याला त्यात सोन्याच्या खुणा आढळल्या. त्या काळात जॉनने खाणीतून 56 किलो सोने काढले होते. यानंतर 1804 ते 1860 या काळात सोने काढण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण काहीही झाले नाही. खोदकामा दरम्यान अनेकांचा मृत्यू झाल्याने, खाणीतील खोदकाम बंद पडले.

‘लेवेली’ला सापडले सोन्याचे साठे

1871 मध्ये या खाणीवर संशोधन सुरू झाले. खरेतर, निवृत्त ब्रिटीश सैनिक मायकेल फिट्झगेराल्ड लेवेलीने 1804 मध्ये एशियाटिक जर्नलमध्ये प्रकाशित केलेला अहवाल वाचला ज्यात कोलारमधील या सोन्याच्या खाणीचा उल्लेख आहे. लेवेली खूप उत्साहित होऊन भारतात आला. त्याने खाणीच्या 100 किमीच्या आत प्रवास केला आणि जिथे सोने सापडेल अशा ठिकाणांना चिन्हांकित केले. त्यामुळे सोन्याचे साठे असलेली ठिकाणे शोधण्यात त्यांना यश आले.

म्हैसूरच्या महाराजांनी दिला खाण परवाना

पहिल्या यशानंतर जॉनने 1873 मध्ये म्हैसूरच्या महाराजांना खाणकामासाठी परवाने देण्याची परवानगी मागितली. महाराजांनी 2 फेब्रुवारी 1875 रोजी परवाना जारी केला. जॉनने यासाठी गुंतवणूकदार शोधून काढले आणि खाणकामाचे काम जॉन टेलर अँड सन्स या ब्रिटिश कंपनीकडे सोपवले. अशा प्रकारे केजीएफमधून सोने काढण्याचे काम सुरू झाले. एकेकाळी देशाचे 95 टक्के सोने येथून बाहेर यायचे, आज ते उद्ध्वस्त झाले आहे, मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यावेळी भारतात जे सोने यायचे त्यापैकी 95 टक्के सोने या केजीएफमधून यायचे. अशा प्रकारे भारत सोन्याच्या उत्पादनात सहाव्या क्रमांकावर पोहोचला होता.

केजीएफमध्ये आहे अजूनही सोने

1930 मध्ये कोलार गोल्ड फिल्डमधील सोन्याचा साठा कमी होऊ लागला. भारत स्वतंत्र होईपर्यंत तो इंग्रजांच्या ताब्यात होता. स्वातंत्र्यानंतर 1956 मध्ये ही खाण केंद्राच्या ताब्यात गेली. सध्या या खाणीचे केवळ अवशेष शिल्लक राहीले आहेत. सोने काढण्यासाठी खोदलेले बोगदे आता पाण्याने भरले आहेत. केजीएफमध्ये अजूनही सोने असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे, परंतु खाणीच्या सध्याच्या स्थितीवरून हे स्पष्ट आहे की येथे जेवढे सोने उपलब्ध आहे त्यापेक्षा जास्त सोने काढण्यासाठी खर्च येईल.

हेही वाचा:

Sanjay Dutt: हिंदी चित्रपटांचं कुठे चुकतंय? RRR, KGF2च्या यशानंतर संजय दत्तने सांगितलं कारण

KGF 2: ‘हा खरा फॅमिली मॅन’; पत्नी-मुलांसोबत समुद्रकिनारी ‘पिकनिक’ करणाऱ्या यशच्या फोटोवर कमेंट्सचा पाऊस

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI