वाशिम जिल्ह्यात 8 शिक्षकांना कोरोना, तर 939 शिक्षकांच्या चाचण्या अद्याप बाकी

| Updated on: Nov 22, 2020 | 7:52 AM

राज्यातील इयत्ता 9 वी ते 12 चे वर्ग सोमवारपासून सुरु होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. यामध्ये आतापर्यंत आठ शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

वाशिम जिल्ह्यात 8 शिक्षकांना कोरोना, तर 939 शिक्षकांच्या चाचण्या अद्याप बाकी
Follow us on

वाशिम : राज्यातील इयत्ता 9 वी ते 12 चे वर्ग सोमवारपासून सुरु होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. यामध्ये आतापर्यंत आठ शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. दरम्यान, शिक्षकच कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पालक आणि शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात अजूनही 939 शिक्षकांच्या कोरोना चाचण्या होणे बाकी आहे. (8 teachers found corona positive in washim district)

राज्यातील शैक्षणिक संस्थेतील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग येत्या सोमवारपासून सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आवश्यक त्या सर्व खबरदाऱ्या घेण्यात येत आहेत. शाळेचा परिसर सॅनिटाइझ करणे, सॅनिटायझर उपलब्ध करून देणे तसेच शिक्षकांच्या कोरोना चाचण्यासुद्धा करण्यात आहेत. यामध्ये जिल्ह्यात 2551 शिक्षकांपैकी आतापर्यंत 1612 शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी आठ शिक्षकांच्या कोरोना चाचण्या या पॉझिटिव्ह आल्या आहेत. या शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्याने पालक तसेच इतर शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.

दरम्यान, राज्यातील शाळा (Schools Reopen) सुरु केल्यानंतर स्थानिक प्रशासनाचा भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरु कराव्यात. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, त्या जिल्ह्यातील शाळा सुरु करत असताना स्थानिक जिल्हा अधिकारी, गट विकास अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करावा. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शैक्षणिक हित जपूनच योग्या तो निर्णय घ्यावा, अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिल्या आहेत.

शाळेत येणे सक्तीचे नाही : प्राजक्त तनपुरे

शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी मुलांना शाळेत येणे सक्तीचे नाही. मुलं घरी राहूनदेखील ऑनलाईन शिक्षण घेऊ शकतात, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शनिवारी दिली. ते अहमदनगरला पत्रकारांशी बोलत होते. (8 teachers found corona positive in washim district)

संंबंधित बातम्या :

दिल्ली इफेक्ट, मुंबईतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार, आयुक्तांचा निर्णय

मुंबईतील सर्व शिक्षकांच्या अँटी पीसीआर चाचण्या, पालिका प्रशासनाचा निर्णय

शाळा सुरू झाली तरी शाळेत येणे सक्तीचे नाही; राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची माहिती