AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पर्सनल फोटो असलेला मोबाईल विकला,  व्हायरल झाल्यानंतर हत्या-आत्महत्या-एन्काऊंटर

नवी दिल्ली : स्मार्टफोन ही सध्या सर्वांसाठी गरजेची वस्तू झाली आहे. स्मार्टफोनमध्ये आपण फोटो, फाईल्स यासारख्या नेहमी गरजेच्या अनेक गोष्टी सेव्ह करतो. मात्र कधी तरी स्मार्टफोन खराब झाल्यामुळे किंवा नवीन स्मार्टफोन घेतल्यामुळे आपण तो विकून टाकतो. मात्र स्मार्टफोन चेक न करता विकल्याचा एका ग्राहकाला चांगलाचा फटका बसला आहे. उत्तरप्रदेशातील मेरठमध्ये राहणाऱ्या शुभम कुमारने काही दिवसांपूर्वी […]

पर्सनल फोटो असलेला मोबाईल विकला,  व्हायरल झाल्यानंतर हत्या-आत्महत्या-एन्काऊंटर
| Updated on: May 27, 2019 | 4:56 PM
Share

नवी दिल्ली : स्मार्टफोन ही सध्या सर्वांसाठी गरजेची वस्तू झाली आहे. स्मार्टफोनमध्ये आपण फोटो, फाईल्स यासारख्या नेहमी गरजेच्या अनेक गोष्टी सेव्ह करतो. मात्र कधी तरी स्मार्टफोन खराब झाल्यामुळे किंवा नवीन स्मार्टफोन घेतल्यामुळे आपण तो विकून टाकतो. मात्र स्मार्टफोन चेक न करता विकल्याचा एका ग्राहकाला चांगलाचा फटका बसला आहे.

उत्तरप्रदेशातील मेरठमध्ये राहणाऱ्या शुभम कुमारने काही दिवसांपूर्वी आपला स्मार्टफोन चेक न करता अनुज प्रजापती नावाच्या व्यक्तीला विकून टाकला. त्या फोनमध्ये शुभमने आपल्या आधीच्या गर्लफ्रेंडचे काही आक्षेपार्ह फोटो सेव्ह केले होते. मात्र हे फोटो डिलीट न करताच त्याने तो फोन अनुजला विकला. त्यानंतर अनुजने शुभमच्या गर्लफ्रेंडचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.

हे फोटो पाहिल्यानंतर त्या महिलेला जबरदस्त मानसिक धक्का बसला. तिने अनुजला फोन करुन याप्रकरणी जाब विचारण्यास सुरुवात केली. या रागात शुभमने आपल्या मित्रांच्या मदतीने अनुजची हत्या केली. यानंतर पोलिसांनी महिलेची चौकशी सुरु केली.

आक्षेपार्ह स्थितीतील फोटो व्हायरल होणे आणि अनुजच्या हत्येचा संशय यामुळे त्रासलेल्या महिलेने पाच वर्षीय मुलासह विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. यात 5 वर्षीय मुलाला वाचवण्यात यश आले असले, तर महिलेचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरुन सीसीटिव्ही फुटेज जप्त करण्यात आलं आहे. आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाल्याने आणि अनुजच्या हत्येमध्ये नाव आल्याने महिलेने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणानंतर उत्तरप्रदेशातील सहारनपूर पोलिसांनी चेक नाक्यावरुन शुभम आणि त्याचे मित्र मोटार सायकलवरुन जात होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना थांबण्यास सांगितले असता, शुभम आणि त्याच्या मित्रांनी पोलिसांवर गोळीबार केला. याला पोलिसांनी प्रत्युत्तर देत, दोघांच्या पायावर गोळी मारली. यानंतर उत्तरप्रदेशातील सहारनपूर पोलिसांनी शुभम त्याच्या मित्रांना अटक केली आहे.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.