प्रियंका-मितूच्या सांगण्यावरुन सुशांतचा मृतदेह खाली उतरवला, सिद्धार्थ पिठानीचा सीबीआय चौकशीत दावा

सुशांतने कॉम्प्युटर आणि लॅपटॉपच्या हार्ड डिस्कमधील डाटा डिलीट करण्यास आपल्याला सांगितलं, असा जबाब सिद्धार्थ पिठानीने सीबीआयला दिला.

प्रियंका-मितूच्या सांगण्यावरुन सुशांतचा मृतदेह खाली उतरवला, सिद्धार्थ पिठानीचा सीबीआय चौकशीत दावा
Follow us
| Updated on: Aug 31, 2020 | 9:43 AM

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सुरु असलेल्या सीबीआय चौकशीत सिद्धार्थ पिठानीने सुशांतची बहीण मितू सिंह, प्रियंका, तिचे पती ओपी सिंह या तिघांची नावं घेतली आहेत. मितू आणि प्रियंका यांना 14 तारखेला फोनवर सुशांतच्या आत्महत्येबाबत माहिती दिल्याचा दावा सिद्धार्थ पिठानीने केला. (Actor Sushant Singh Rajput Death Case Siddharth Pithani takes names of Mitu Singh and Priyanka)

प्रियंका आणि मितू यांच्या सांगण्यावरुन सुशांतचा मृतदेह फासावरुन खाली उतरवल्याचे सिद्धार्थने सांगितले. दीपेशने चाकूने पंख्याला लागलेला दोर कापला होता, तर आपण मृतदेह खाली काढला, असे सिद्धार्थने सीबीआयला सांगितल्याची माहिती आहे. सीबीआय मितू सिंह, प्रियंका, तिचे पती ओपी सिंह या तिघांचाही जबाब आज नोंदवण्याची शक्यता आहे.

दिशा सालियानच्या मृत्यूनंतर सुशांत तणावात होता. त्यानेचे कॉम्प्युटर आणि लॅपटॉपच्या हार्ड डिस्कमधील डाटा डिलीट करण्यास आपल्याला सांगितलं, असा जबाब सिद्धार्थ पिठानीने सीबीआयला दिला.

हेही वाचा : “रियाला 2017 मध्ये भेटलो” हॉटेलियर गौरव आर्याला ईडीचे समन्स

‘सीएफएसएल’ने (Forensic Investigation of Crime and Scientific Services – गुन्हे आणि वैज्ञानिक फॉरेन्सिक अन्वेषण) सीबीआयला 413 पानी क्राईम सीन रिपोर्ट दिला आहे. त्या आधारे रिया आणि सुशांतच्या बॅंक खात्याचं फॉरेन्सिक ऑडीट होण्याची शक्यता आहे. सगळ्यांची पुन्हा एकदा चौकशी होण्याची शक्यता आहे.

(Actor Sushant Singh Rajput Death Case Siddharth Pithani takes names of Mitu Singh and Priyanka)

गौरव आर्याची ईडी चौकशी

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या ईडीने हॉटेलियर गौरव आर्याला समन्स बजावले आहे. गौरव आर्याला आज (सोमवार 31 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता अंमलबजावणी संचालनालयाने चौकशीसाठी कार्यालयात बोलावले आहे. टॅमरिंड हॉटेलचा मालक असेलला गौरव आर्या काल गोव्यातील अंजुना भागात असलेल्या आपल्या हॉटेलमध्ये होता. त्यानंतर तो मुंबईला आला.

सीबीआयच्या रडारवर असलेली सुशांतची गर्लफ्रेंड- अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि गौरव आर्या यांचे जुने संबंध असलेल्याचे ईडीच्या तपासात चॅट्समधून उघड झाले. त्यानंतर ईडीने गौरवलाही चौकशीसाठी पाचारण केले आहे.

“माझा या खटल्याशी काही संबंध नाही. मी सुशांतसिंह राजपूतला कधी भेटलो नाही. मी तिला (रिया) 2017 मध्ये भेटलो होतो” अशी माहिती गौरवने गोवा विमानतळावर माध्यमांशी बोलताना दिली.

रियाचे गौरवसोबत काय संबंध आहेत, त्याचे सुशांतच्या आत्महत्येशी संबंध आहेत का, गौरव आणि रियामध्ये ड्रग्ज संबंधित पैशांचा व्यवहार झालाय का, याचा ईडीकडून तपास होणार आहे.

संबंधित बातम्या :

मला बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती, केंद्र सरकारने सुरक्षा द्यावी : कंगना

कंगना ड्रग्जशी संबंधित नेते-अभिनेत्यांची नावे सांगण्यास तयार, सरकारकडून सुरक्षा का नाही? : राम कदम

(Actor Sushant Singh Rajput Death Case Siddharth Pithani takes names of Mitu Singh and Priyanka)

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.