Vidyut Jammwal | ‘हॉटस्टार’ने दुजाभाव केल्याचा आरोप, अभिनेता विद्युत जामवालची नाराजी

| Updated on: Jun 29, 2020 | 5:37 PM

'हॉटस्टार'ने भुज, सडक 2, लुडो, कुली नंबर 1 आणि लक्ष्मी बॉम्ब यासारख्या बॉलिवूड चित्रपटांच्या रिलीजच्या तारखांची घोषणा केली

Vidyut Jammwal  | हॉटस्टारने दुजाभाव केल्याचा आरोप, अभिनेता विद्युत जामवालची नाराजी
Follow us on

मुंबई : ‘हॉटस्टार’ने सात बॉलिवूड चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखांची घोषणा करताना केवळ बडे कलाकार असलेल्या पाच चित्रपटांवर लक्ष केंद्रित केल्याने अभिनेता विद्युत जामवाल याने नाराजी व्यक्त केली. ‘ही साखळी सुरुच राहणार’ या विद्युतच्या प्रतिक्रियेला सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येच्या निमित्ताने चर्चेत आलेल्या कंपूशाहीची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आऊटसाईडरचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. (Vidyut Jammwal calls out Hotstar for ignoring his movie)

‘हॉटस्टार’ने भुज, सडक 2, लुडो, कुली नंबर 1 आणि लक्ष्मी बॉम्ब यासारख्या सात बॉलिवूड चित्रपटांच्या रिलीजच्या तारखांची घोषणा केली. हे सर्व चित्रपट थेट डिजिटली प्रदर्शित होणार आहेत. मात्र आपला ‘खुदा हाफिज’ हा सिनेमाही यासोबत प्रदर्शित होत असताना आपल्याला लाईव्हसाठी निमंत्रणही न पाठवून डावलले, असा आरोप विद्युतने केला आहे. कुणाल खेमूच्या ‘लूटकेस’ सिनेमालाही या घोषणेतून वगळल्याचे दिसते.

सुशांतसिंह राजपूतचा अखेरचा चित्रपट ‘दिल बेचारा’ 24 जुलैला प्रदर्शित होणार आहे. तर जुलै ते ऑक्टोबर दरम्यान भुज, सडक 2, लुडो, कुली नंबर 1, बिग बुल, लक्ष्मी बॉम्ब हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. परंतु लाईव्ह कार्यक्रमात ‘खुदा हाफिज’ आणि ‘लूटकेस’ या सिनेमातील कलाकार नव्हते.

“निश्चितपणे मोठी घोषणा !! सात चित्रपट रिलीज होणार आहेत, पण फक्त 5 चित्रपट प्रतिनिधित्व करण्यासाठी पात्र मानले गेले. उर्वरित दोन चित्रपटांना कोणतेही आमंत्रण किंवा माहिती दिली नाही. हा दीर्घ रस्ता आहे. हे चक्र सुरुच राहणार” अशा आशयाचे ट्वीट विद्युतने केले आहे.

हेही वाचा : अक्षय, अजय, आलियाचे चित्रपट ‘हॉटस्टार’वर, तब्बल 700 कोटींची डील

कोणत्या बड्या कलाकारांना निमंत्रण?

अक्षय कुमार – लक्ष्मी बॉम्ब
अजय देवगण – भुज
वरुण धवन – कुली नंबर 1
अभिषेक बच्चन – ल्यूडो
आलिया भट – सडक 2

अक्षय कुमार, अजय देवगण, आलिया भट, अभिषेक बच्चन, वरुण धवन अशा दिग्गज अभिनेत्यांचे चित्रपट थेट ‘हॉटस्टार’वर रिलीज करण्यासाठी करार झाले आहेत. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने जवळपास साडेतीन महिन्यांपासून सिनेमागृह बंद आहेत. ती इतक्यात उघडण्याची शक्यता नसल्याने अनेक मोठे चित्रपट निर्माते चित्रपट डिजिटल प्रदर्शित करण्याचा मार्ग निवडत आहेत.

कोणाची कितीला डील? (अंदाजे आकडे)

अक्षय कुमार – लक्ष्मी बॉम्ब – 130 कोटी
अजय देवगण – भुज – 125 ते 130 कोटी
वरुण धवन – कुली नंबर 1 – 120 कोटी
अभिषेक बच्चन – बिग बुल – 80 कोटी
अभिषेक बच्चन – ल्यूडो – 80 कोटी
राजकुमार राव – छलांग – 70 कोटी
सुशांतसिंग राजपूत – दिल बेचारा – 70 कोटी
आलिया भट – गंगूबाई काठियावाडी –
आलिया भट – सडक 2

(Vidyut Jammwal calls out Hotstar for ignoring his movie)