Sushant Singh Rajput | रियाने सुशांतला खूप त्रास दिला, अंकिता लोखंडेचा धक्कादायक जबाब, व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा दाखला

| Updated on: Jul 30, 2020 | 12:34 AM

सुशांतची गर्लफ्रेंड रिया ही त्याला खूप त्रास द्यायची, याबाबत सुशांतने स्वत: तिला सांगितलं, असं अंकिताने बिहार पोलिसांना सांगितलं

Sushant Singh Rajput | रियाने सुशांतला खूप त्रास दिला, अंकिता लोखंडेचा धक्कादायक जबाब, व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा दाखला
Follow us on

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी आता त्याची (Actress Ankita Lokhande Statement About Rhea Chakraborty) एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने खळबळजनक खुलासे केले आहेत. सुशांतची गर्लफ्रेंड रिया ही त्याला खूप त्रास द्यायची, याबाबत सुशांतने स्वत: तिला सांगितलं, असं अंकिताने बिहार पोलिसांना सांगितलं (Actress Ankita Lokhande Statement About Rhea Chakraborty).

बिहारच्या पाटणा येथील राजीव नगर पोलीस ठाण्यात सुशांतचे वडील के. के. सिंह यांच्या तक्रारीनंतर रिया चर्कवर्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जबाब नोंदवण्यासाठी आज बिहार पोलीस अंकिता लोखंडेच्या घरी पोहोचले. गोरेगाव येथील अंकिताच्या राहत्या घरी बिहार पोलिसांनी भेट देत तिचा जबाब नोंदवला.

यावेळी अंकिताने तिच्या जबाबात रियाबाबत अनेक खळबळजनक गोष्टी सांगितल्या. “मणिकर्णिका चित्रपटाच्या प्रमोशनवेळी सुशांतने आपल्याला फोन केला होता. यावेळी त्याने माझं अभिनंदन केलं. त्यानंतर तो रिया बद्दल बोलत होता. रिया मला खूप त्रास देते. तिच्या सोबतच्या रिलेशनमध्ये मला रहायचं नाही. मला तिच्या पासून दूर व्हायचं आहे. मला काही सुचत नाही, असं सुशांतच म्हणणं होतं”, अशी माहिती अंकिताने पोलिसांना दिली.

तसेच, त्यानंतरही अनेकदा सुशांतचे आणि माझ्या व्हॉट्सअ‍ॅपवर गप्पा झाल्या. यावेळीही सुशांत रियाबाबत सांगत होता, असंही अंकिताने सांगितलं. अंकिताच्या या जबाबानंतर आता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला नवं वळणं येण्याची शक्यता आहे.

रियावर गुन्हा दाखल, अंकिता लोखंडेचं ट्वीट 

रिया चक्रवर्तीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडेने “विजय सत्याचाच”, असं ट्वीट केलं. अंकिताने केवळ ‘विजय सत्याचाच’ इतकेच लिहिलेला फोटो ट्वीट केला आहे. त्याला कोणताही संदर्भ किंवा हॅशटॅग, मेन्शन नाही. मात्र, सुशांतच्या आत्महत्ये प्रकरणी त्याच्या वडिलांच्या तक्रारीनंतर रियाविरोधात गुन्हा दाखल होताच अंकिताने ट्वीट केल्यामुळे चाहत्यांनी हा संदर्भ जोडला आहे.

अंकिता लोखंडेचं ट्वीट –

रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी बिहारमध्ये पाटण्यातील राजीव नगर पोलीस ठाण्यात रिया चक्रवर्तीविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. “रियाने सुशांतकडून पैसे घेतले आणि त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले” असा आरोप सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी केला आहे.

रिया चक्रवर्ती अटकपूर्व जामिन अर्जाच्या तयारीत

गुन्हा दाखल झाल्यानंतर रियाने वकिलांमार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याची तयारी केली आहे. मुंबईतील सांताक्रुझमध्ये असलेल्या रियाच्या घरी बिहार पोलीस जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे रियाने आपल्या वकिलांमार्फत अटकपूर्व जामिनाची तजवीज केली आहे. रिया चक्रवर्ती अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालय किंवा मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करु शकते. यासंदर्भात तिने वकील सतीश मानशिंदे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सुशांत सिंह राजपूतची राहत्या घरी आत्महत्या

सुशांत सिंह राजपूत याने रविवारी 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, सुशांतच्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबाने आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला. सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास वांद्रे पोलीस, सायबर सेल, फॉरेन्सिक विभाग आणि मुंबई क्राईम ब्रांचकडून होत आहे.

Actress Ankita Lokhande Statement About Rhea Chakraborty

संबंधित बातम्या :

सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर बिहार पोलीस मुंबईत, रिया चक्रवर्ती अटकपूर्व जामिन अर्जाच्या तयारीत

Rhea Chakraborty | सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणात ट्विस्ट, गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा

Sushant Singh Rajput | धर्मा प्रोडक्शन्स आणि सुशांतमध्ये कुठलाही वाद नाही, चौकशीत अपूर्व मेहतांनी सर्व आरोप फेटाळले