Sushant Singh Rajput | धर्मा प्रोडक्शन्स आणि सुशांतमध्ये कुठलाही वाद नाही, चौकशीत अपूर्व मेहतांनी सर्व आरोप फेटाळले

करण जोहर यांनी सुशांतबाबत कोणतंही आक्षेपार्ह वक्त्यव्य केलं नाही, असं धर्मा प्रोडक्शन्सचे सीईओ अपूर्व मेहता यांनी त्यांच्या जबाबात म्हटलं.

Sushant Singh Rajput | धर्मा प्रोडक्शन्स आणि सुशांतमध्ये कुठलाही वाद नाही, चौकशीत अपूर्व मेहतांनी सर्व आरोप फेटाळले

मुंबई : धर्मा प्रोडक्शन्सचं सुशांतसोबत कोणतंही भांडण नव्हतं किंवा वाद नव्हता (Dharma Productions CEO Apurva Mehta). तसेच, करण जोहर यांनी सुशांतबाबत कोणतंही आक्षेपार्ह वक्त्यव्य केलं नाही, असं धर्मा प्रोडक्शन्सचे (Dharma Productions) सीईओ अपूर्व मेहता यांनी त्यांच्या जबाबात म्हटलं. अपूर्व मेहता यांनी करण आणि सुशांतच्या वादाबाबतच्या दाव्याचं खंडण केलं आहे. आज (28 जुलै) सुशांत सिंह राजपूत प्रकरणी धर्मा प्रोडक्शन्सचे सीईओ अपूर्वा मेहता यांची चौकशी करण्यात आली. ही चौकशी तब्बल चार तास चालली. यावेळी मेहता यांना अनेक प्रश्न विचारुन पोलिसांनी महत्वाची माहिती मिळवण्याचा प्रयन्त केला (Dharma Productions CEO Apurva Mehta).

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा तपास वांद्रे पोलीस करत आहेत. वांद्रे पोलिसांनी आज धर्मा प्रोडक्शन्सचे सीईओअपूर्व मेहता यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. ही चौकशी नेहमी वांद्रे पोलीस स्टेशन येथे होत असते. मात्र,अपूर्व मेहता यांना माध्यमांपासून दूर ठेवण्यासाठी ऐनवेळी चौकशी दुसऱ्याच जागी घेण्याचं ठरवण्यात आलं.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

ही चौकशी अंबोली पोलीस स्टेशन येथे घेण्यात आली. सकाळी ठिक अकरा वाजता अपूर्व मेहता हे अंबोली पोलीस स्टेशन येथे पोहचले आणि त्यानंतर त्यांची चौकशी सुरु झाली. ही चौकशी दुपारी तीन वाजता संपली. एकूण चार तास ही चौकशी चालली.

यावेळी मेहता यांना सुशांतच्या डिप्रेशन बाबत विचारण्यात आलं. सुशांत आणि धर्मा प्रोडक्शन्समधील व्यवहार त्याच्या डिप्रेशनचं कारण आहे का?, अस त्यांना विचारण्यात आलं (Dharma Productions CEO Apurva Mehta).

अपूर्व मेहता यांनी दिलेला जबाब

“सुशांतला घेऊन आम्ही ‘ड्राईव्ह’ हा सिनेमा बनवत होतो. चित्रपटाच्या कामाला 2016 मध्ये सुरुवात झाली. चित्रपट 2017 साली बनला, पण पूर्ण झाला नाही. खऱ्या अर्थाने चित्रपट 2019 मध्ये पूर्ण झाला. नोव्हेंबर 2019 मध्ये हा चित्रपट आम्ही चित्रपटगृहात प्रदर्शित करणार होतो. मात्र, चित्रपटाला रेटिंग मिळालं नाही. यामुळे आम्ही तो थोड्या दिवसांनी रिलीज करायचं ठरवलं. त्यात दोन तीन महिने निघून गेल आणि तेवढ्यात लॉकडाऊन सुरु झालं. यामुळे बिझनेसचा विचार करुन आम्ही ‘ड्राइव्ह’ हा चित्रपट नेटवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत आमचं सुशांतसोबत कोणतंही भांडण नव्हतं, वाद नव्हता. त्याचप्रमाणे धर्मा प्रोडक्शन्सचे करण जोहर यांनी सुशांतबाबत कोणतेही आक्षेपार्ह वक्त्यव्य केलं नाही”, अशी माहिती अपूर्व मेहता यांनी त्यांच्या जबाबात दिली.

करण जोहर आणि सुशांतचा वाद काय?

प्रत्यक्षात ‘ड्राईव्ह’ हा चित्रपट 2016 मध्ये सुरु झाला आणि 2017 मध्ये पूर्ण झाला होता. मात्र, त्यानंतर करण जोहर (Karan Johar) आणि सुशांत यांच्यात वाद झाला होता. करण जोहरने सुशांतच्या विरोधात गंभीर टिप्पणी केली होती. वाद झाल्याने करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन्सने ‘ड्राईव्ह’ चित्रपट रिलीज करण्यास टाळाटाळ केली.

त्याच काळात सुशांतच्या चित्रपटाला सिनेमागृह मिळत नाही, अशी चर्चा सुरु होती. यामुळे फॉक्स स्टार या कंपनीने सुशांतचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट रिलीज करण्याचं टाळल्याचं म्हटलं जातं होतं. दोन महत्त्वाचे चित्रपट बनून ते प्रदर्शित होत नव्हते. वरुन बदनामी सुरु होती. सुशांतच्या डिप्रेशनमागे हे एक कारण होतं, अस म्हटलं जातं. यामुळे धर्मा प्रोडक्शन्सच्या अपूर्व मेहता यांची चौकशी करण्यात आली. मात्र, याबाबत आपल्या जबाबात मेहता यांनी या आरोपांचं खंडण केलं आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

सुशांत सिंह राजपूतची राहत्या घरी आत्महत्या

सुशांत सिंह राजपूत याने रविवारी 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, सुशांतच्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबाने आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला. सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास वांद्रे पोलीस, सायबर सेल, फॉरेन्सिक विभाग आणि मुंबई क्राईम ब्रांचकडून होत आहे.

Dharma Productions CEO Apurva Mehta

संबंधित बातम्या :

Sushant Singh Rajput Suicide | करण जोहरला चौकशीसाठी बोलवलं जाणार : गृहमंत्री

घराणेशाहीला ‘चेकमेट’ करण्यासाठी ‘क्वीन’ मैदानात, सुशांत आत्महत्या प्रकरणी जबाब देण्यासाठी कंगनाचे पोलिसांना पत्र

Published On - 8:00 pm, Tue, 28 July 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI