Rhea Chakraborty | सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणात ट्विस्ट, गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला (Sushant Singh Rajput's Father Files FIR Against Actor Rhea Chakraborty) आहे.

Rhea Chakraborty | सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणात ट्विस्ट, गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल केला आहे. बिहारच्या पाटण्यातील राजीव नगर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. “रियाने सुशांतकडून पैसे घेतले आणि त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले,” असा आरोप सुशांतचे वडिल के. के. सिंह यांनी केला आहे. (Sushant Singh Rajput’s Father Files FIR Against Actor Rhea Chakraborty)

सध्या सुशांत सिंहच्या आत्महत्येचा मुंबई पोलीस तपास करत आहेत. मात्र मुंबई पोलिसांच्या तपासावर मला विश्वास नाही, असे सुशांतच्या वडिलांचे म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी पाटणा पोलिसांना याबाबतची चौकशी करण्याची विनंती केली आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर

सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहे. के.के. सिंह यांच्या तक्रारीनुसार, “रियाने सुशांतला फसवलं. तिने त्याच्याकडून पैसे घेतले. तसेच त्याला कुटुंबापासून पूर्णपणे वेगळे केले. त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले,” असे ते म्हणाले. या तक्रारीनुसार रियाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटण्यातील राजीव नगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. रियावर आयपीसी 341, 342, 380, 406, 420, 306 हे कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सुशांतच्या आत्महत्येच्या चौकशीसाठी पाटणाचे पोलीस अधीक्षक उपेंद्र शर्मा यांनी राजीव नगरचे ठाण्याचे प्रभारी यांना मुख्य तपास अधिकारी बनवण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समितीला मुंबईत पाठवण्यात आले आहे. ही टीम मुंबई पोलिसांसोबत चौकशी करणार आहे.

रिया चक्रवर्तीची नऊ तास चौकशी 

सुशांतसिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिची गुरुवारी (18 जून) जवळपास नऊ तास चौकशी करण्यात आली होती. सकाळी 11 च्या सुमारास वांद्रे पोलिसात दाखल झालेल्या रियाचा जबाब रात्री जवळपास आठ वाजता संपला.

सुशांत सिंह राजपूतची राहत्या घरी आत्महत्या

सुशांत सिंह राजपूत याने रविवारी 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, सुशांतच्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबाने आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला. सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास वांद्रे पोलीस, सायबर सेल, फॉरेन्सिक विभाग आणि मुंबई क्राईम ब्रांचकडून होत आहे. (Sushant Singh Rajput’s Father Files FIR Against Actor Rhea Chakraborty)

संबंधित बातम्या : 

तब्बल नऊ तास रिया चक्रवर्तीची विचारपूस, वांद्रे पोलिसात जबाब नोंदवला

Sushant Singh Rajput Suicide | करण जोहरला चौकशीसाठी बोलवलं जाणार : गृहमंत्री

Published On - 8:03 pm, Tue, 28 July 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI