‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये पुन्हा एकदा ‘वहिनी साहेबां’चा दरारा, ‘ही’ अभिनेत्री नंदिताच्या भूमिकेत दिसणार!

‘नंदिता’ साकारणाऱ्या अभिनेत्री धनश्री काडगांवकरने मालिकेला ‘रामराम’ म्हटल्याने कथेत ट्विस्ट आला होता.

‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये पुन्हा एकदा ‘वहिनी साहेबां’चा दरारा, ‘ही’ अभिनेत्री नंदिताच्या भूमिकेत दिसणार!

मुंबई : मालिका विश्वात राणा आणि अंजलीची जोडी चांगलीच चर्चेत आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत इतर पात्रांप्रमाणे ‘नंदिता वहिनीं’ची (Nandita Vahini) खलनायकी भूमिकाही तितकीच लक्षवेधी ठरली होती. मालिकेतील ‘वहिनी साहेबां’चे पात्र संवाद आणि तिच्या हटके स्टाईलमुळे लोकप्रिय झाले होते. मध्यंतरीच्या काळात कथानकाप्रमाणे या वहिनी साहेबांची तुरुंगात रवानगी झाली होती. ‘नंदिता’ साकारणाऱ्या अभिनेत्री धनश्री काडगांवकरने मालिकेला ‘रामराम’ म्हटल्याने कथेत ट्विस्ट आला होता. फसवेगिरी आणि कटकारस्थानासाठी शिक्षा भोगत असलेल्या नंदिता वहिनी म्हणजेच वहिनीसाहेब आता पुन्हा मालिकेत एंट्री करत आहेत. अभिनेत्री माधुरी पवार (Madhuri Pawar) आता ही भूमिका साकारणार आहे. (Actress Madhuri Pawar will play nandita vahini in tuzyat jeev rangala)

एकीकडे या मालिकेला आता वेगळे वळण मिळत असताना, या वाड्यात नंदिता वहिनीची पुन्हा एकदा एंट्री होत आहे. तिच्यासोबत सुरज देखील मालिकेत परतणार आहे. इतकी वर्षे या मालिकेत अभिनेत्री धनश्री कडगांवकर नंदिता वहिनींच्या भूमिकेत लोकप्रिय ठरली. मात्र आता नव्या दमदार एंट्रीसह, एक नवा चेहरा या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

आता अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवार ही ‘नंदिता वहिनी’ म्हणजेच वहिनीसाहेबांची भूमिका साकारताना दिसणार आहे. माधुरी ही एक उत्तम नृत्यांगना असून तिने ‘अप्सरा आली’ या नृत्यावर आधारित कार्यक्रमात प्रथम क्रमांक पटकावला होता. मात्र, आता ती आता नंदिता वहिनींच्या भूमिकेत काय कमाल करणार आहे याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. (Actress Madhuri Pawar will play nandita vahini in tuzyat jeev rangala)

मालिकेत पुन्हा एकदा नवा ट्विस्ट

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ लवकरच 4 वर्षे आणि 1200 एपिसोडचा टप्पा पूर्ण करत आहे. याचे निमित्त साधून मालिकेत पुन्हा एकदा वहिनी साहेबांना बोलवले जाणार आहे. आता नंदिता वहिनी एक नवा धमाका घेऊन मालिकेत परतणार आहेत. मात्र, नंदिता वहिनी आणि सुरज या दोघांना गोदाक्का आणि राणादा घरात घेतील की नाही? नंदिता वहिनीत काय बदल झाला असेल?, याचा उलगडा लवकरच मालिकेत होणार आहे. नंदिता वहिनीच्या एंट्रीचा एक नवा प्रोमोही नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.(Actress Madhuri Pawar will play nandita vahini in tuzyat jeev rangala)

जिजा-राणाची धमाल कथा

सध्या मालिकेत अंजली बाई ‘जिजा’चे रूप घेऊन राणाला भुलवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, राणा कुस्तीकडे लक्ष देण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. इतक्या प्रयत्नानंतर आता जिजाच अंजली आहे हे राणा कळेल का? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

(Actress Madhuri Pawar will play nandita vahini in tuzyat jeev rangala)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI