पायल घोषविरोधात रिचा चढ्ढा कोर्टात, ठोकला 1.1 कोटींचा मानहानीचा दावा

अभिनेत्री रिचा चढ्ढाने पायल घोषविरोधात मुंबई हायकोर्टात 1.1 कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे. (Actress Richa Chadha has filed a defamation suit against Payal Ghosh in the Mumbai High Court)

पायल घोषविरोधात रिचा चढ्ढा कोर्टात, ठोकला 1.1 कोटींचा मानहानीचा दावा

मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्यपवर (Anurag Kashyap) लैंगिक गैरवर्तनाचे आरोप करणाऱ्या अभिनेत्री पायल घोषच्या अडचणी वाढल्या आहेत. अभिनेत्री रिचा चढ्ढाने (Richa Chadda) पायल घोषविरोधात (Payal Ghosh ) मुंबई हायकोर्टात 1.1 कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे. रिचाने दाखल केलेल्या मानहानी केसवर मुंबई हायकोर्ट बुधवारी (7 ऑक्टोबर) देणार आहे. (Actress Richa Chadha has filed a defamation suit against Payal Ghosh in the Mumbai High Court)

पायल घोषने अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. पायलने आपली बाजू मांडताना, ‘काही नट्यां अनुरागसोबत काम करण्यासाठी वाट्टेल  ते करायला तयार असतात’, असा दावाही केला होता. हा दावा करताना पायलने रिचा चढ्ढा, माही गिल, हुमा कुरेशी या नट्यांची नावं घेतली आहेत.

पायल घोषच्या याच दाव्याविरोधात अभिनेत्री रिचा चढ्ढाने कोर्टात धाव घेत 1.1 कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे. त्यामुळे पायल घोषच्या अडचणींत वाढ झाली आहे. रिचाने दाखल केलेल्या केसवर मुंबच उच्च न्यायालयात मंगळवारी युक्तीवाद झाला. पण पायल घोषची बाजू मांडण्यासाठी कुणीही न आल्यामुळे कोर्टाने पायलला एका दिवसाचा वेळ दिला आहे. न्यायालयाने पायल घोषला नोटीस पाठवत, या प्रकरणावर बुधवारी सुनावणीदरम्यान आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत.

अनुराग कश्यपवर आरोप करण्यासाठी पायल घोषने रिचाचे नाव घेतल्यामुळे बॉलिवूड जगतात खळबळ उडाली होती. त्यावर स्पष्टीकरण म्हणून रिचाने निवेदन जाहीर केले होते. त्यात पायलने केलेले सर्व दावे रिचाने फेटाळून लावले होते. रिचाने आपल्या निवेदनात सांगितलं आहे की, ‘प्रत्येक अन्यायग्रस्त महिलेला न्याय हा मिळायलाच हवा. पण कुठलेही आरोप करण्याअगोदर आपण कुणाची नाहक बदनामी तर करत नाही ना? याची शहानिशा करणे गरजेचे आहे. आपण केलेल्या दाव्यामुळे कुणाचे नाव बदनाम होणार नाही याचीही प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी.’

दरम्यान पायल घोषच्या आरोपानंतर बॉलिवूडमधून कित्येक कलाकारांनी अनुरागला पाठिंबा दिला होता. दिग्दर्शक अनुभव सिन्हा, अभिनेत्री तापसी पन्नू यांनी अनुरागला पाठिंबा देत त्याच्या सोबत असल्याचे सांगितले होते.

संबंधित बातम्या :

Payal Ghosh | अनुराग विरोधात ठोठावले राष्ट्रीय महिला आयोगाचे दरवाजे, पायल घोष दिल्लीला रवाना!

Anurag Kashyap | अनुराग कश्यप खोटारडे, त्यांची नार्को टेस्ट करा, पायल घोषची मागणी

Breaking | अभिनेत्री पायल घोष, मंत्री रामदास आठवले राज्यपालांच्या भेटीला

(Actress Richa Chadha has filed a defamation suit against Payal Ghosh in the Mumbai High Court)

Published On - 4:42 pm, Tue, 6 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI