Corona Virus | कोरोनाचा धसका, या देशात चौकाचौकात वॉश बेसिन

| Updated on: Mar 13, 2020 | 1:43 PM

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी या देशाने कंबर कसली असून बचावासाठी या देशात मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे.

Corona Virus | कोरोनाचा धसका, या देशात चौकाचौकात वॉश बेसिन
Follow us on

किगाली : चीनच्या वुहान शहरात जन्माला (Rwanda Wash Sink to Prevent Corona) आलेल्या कोरोना विषाणू (Corona Virus) आता जगभरात पसरला आहे. जागतिक आरोग्य संस्था (WHO) ने या विषाणूला जगभरात पसरणारा साथिचा आजार म्हणून घोषित केलं आहे. या विषाणूमुळे जगभरात आतापर्यंत 4 हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांनी कोरोनाबाबत खबरदारी घेण्याच्या (Rwanda Wash Sink to Prevent Corona) सूचना केल्या आहेत.

मात्र, एक असाही देश आहे. जिथे आतापर्यंत (Rwanda Wash Sink to Prevent Corona) कोरोनाचा एकही संशयित आढळलेला नाही. तरीही या देशाने कोरोनाशी दोन हात करण्यासाठी कंबर कसली आहे. कोरोना विषाणूपासून बचावासाठी या देशात मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे.

हेही वाचा : Gold Rate | सोन्याचे दर तब्बल 2600 रुपयांनी कोसळले

कोरोनाची धास्ती, जागोजागी वॉश बेसिन

कोरोना विषाणूच्या धोक्याला पाहता मध्य आफ्रिकेतील रवांडा या देशात खास तयारी करण्यात आली आहे. रवांडा सरकारने संपूर्ण देशात जागोजागी वॉश बेसिन बसवण्यात (Rwanda Wash Sink to Prevent Corona) आले आहेत. देशातील सर्व रस्ते, पदपथ, बस स्थानकं, बँका, रेस्टॉरंट आणि दुकांनांच्या बाहेर पोर्टेबल सिंक बसवण्यात आले आहेत.

जिकडे पाहावे तिकडे वॉश बेसिन

‘द न्यू टाईम्स’ने ट्विटरवर एक व्हिडीओ (Rwanda Wash Sink Video) पोस्ट केला. यामध्ये जिकडे पाहावे तिकडे वॉश बेसिन दिसतात. इतकंच नाही तर रवांचे नागरिकही सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा देत आहे. रवांडाचे नागरिक खबरदारी म्हणून हात स्वच्छ करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.

रवांडामध्ये एकही व्यक्ती कोरोनाग्रस्त नाही

रवांडामध्ये कोरोनचं एकही प्रकरण समोर आलेलं नाही. मात्र, शेजारचा देश कॉन्गोमध्या कोरोनाचं एक प्रकरण समोर आलं आहे. त्यामुळे रवांडाने खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. रवांडा सरकारने नागरिकांना वारंवार हात धूण्याचे निर्देश दिले आहेत.

रवांडाचे नागरिकही पूर्ण खबरदारी घेत आहेत. ते या वॉश बेसिनचा (Rwanda Wash Sink to Prevent Corona) पूर्णपणे उपयोग करत आहेत. सोशल मीडियावर सध्या याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.

संबंधित बातम्या :
पुणे, मुंबईनंतर ठाण्यातही कोरोनाचा शिरकाव, राज्यातील बाधितांची संख्या 14 वर

भारतात कोरोनाचा पहिला बळी, कर्नाटकात 76 वर्षीय रुग्णाचा मृत्यू

इराणमध्ये उपपंतप्रधान, आरोग्य मंत्र्यांसह 25 खासदारांना कोरोनाची लागण, 3 खासदारांचा मृत्यू

17 दिवसाच्या चिमुरडीने कोरोनाला हरवलं, उपचाराशिवाय बरी