पुण्यातील कॉलेजमध्ये मिशन अ‍ॅडमिशन, प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरु

राज्यात काल (16 जुलै) बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल (HSC Student First year admission) लागला.

पुण्यातील कॉलेजमध्ये मिशन अ‍ॅडमिशन, प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरु
Follow us
| Updated on: Jul 17, 2020 | 10:20 AM

पुणे : राज्यात काल (16 जुलै) बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल (HSC Student First year admission) लागला. त्यानंतर आजपासून पुण्यात प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरु करण्यात आली आहे. बारावीचे निकाल लागताच आता विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीच्या विद्यालयात प्रवेश घेण्याची ओढ लागली (HSC Student First year admission) आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, सीबीएसई, आयसीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. सर्व नामांकित विद्यालयाची प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया आजपासून ऑनलाईन सुरु झाली आहे.

विद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी जुलै महिन्यात अखेरपर्यंत अर्ज भरण्यास महाविद्यालयांकडून मुदत देण्यात आली आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि इतर व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबत अजून अस्पष्टता आहे. त्यामुळे बारावीनंतर अभियांत्रिकी किंवा इतर क्षेत्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या पुणे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये वाणिज्य शाखेच्या प्रवेशसाठी 50 ते 55 हजार जागा उपलब्ध आहेत. विज्ञान शाखेसाठी तिन्ही जिल्ह्यांसाठी तीस ते बत्तीस हजार जागा उपलब्ध आहेत.

दरम्यान, राज्यात काल बारावीचा निकाल जाहीर झाला. राज्याचा निकाल 90.66% लागला असून यंदाही कोकण विभागाने बाजी मारली. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 95.89 टक्के इतका लागला, तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा (88.18 टक्के) लागला. दुसऱ्या क्रमांकावर पुणे विभाग असून तिथे 92.50 टक्के, तर मुंबई विभागातून 89.35 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

संबंधित बातम्या :

HSC Results Live Update | बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 90.66%

Corona Breaking | पुणे जि. प. शाळांचे ऑनलाइन प्रवेश सुरु

Non Stop LIVE Update
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.