Agriculture College : वैज्ञानिकांनी कृषी क्रांतीच्या माध्यमातून देशाला जगद्गुरू करावे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं आवाहन

| Updated on: Apr 22, 2022 | 6:29 PM

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा 24 वा वार्षिक दीक्षांत समारोह आज राज्यपाल कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी वैज्ञानिकांनी कृषी क्रांतीच्या माध्यमातून देशाला जगद्गुरू करावे असं आवाहन राज्यपालांनी केलंय.

Agriculture College : वैज्ञानिकांनी कृषी क्रांतीच्या माध्यमातून देशाला जगद्गुरू करावे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं आवाहन
राज्यपाल कुलपती भगतसिंह कोश्यारी
Image Credit source: TV9 marathi
Follow us on

परभणी : परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा (Agriculture College) 24 वा वार्षिक दीक्षांत समारोह आज राज्यपाल कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या ऑनलाईन (Online) उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी वैज्ञानिकांनी (Scientists) कृषी क्रांतीच्या माध्यमातून देशाला जगद्गुरू करावे असं आवाहन राज्यपालांनी केलंय. शेती हा भारतीय लोकांच्या जीवनाचा आधार आहे, एकेकाळी इतर देशातून निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य आयात करावा लागणारा आपला देश आज अन्नधान्य उत्पादनात आत्मनिर्भर झाला आहे. हरित क्रांती व श्वेत क्रांती नंतर आज नील क्रांतीच्या दृष्टीने देशाची वाटचाल सुरु आहे. कृषी वैज्ञानिक व कृषी विद्यापीठांनी यापुढे संशोधन कार्य वाढवावे व देशाला जगद्गुरू बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज या समारंभात केलंय.

देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केल्याबद्दल देश कृषी विद्यापीठांचे योगदान कधीही विसरणार नाही असं म्हणत राज्यपालांनी संकटात असलेल्या देशांना देखील अन्नधान्य पुरविण्याची क्षमता देशाला प्रदान केल्याबद्दल कृषी वैज्ञानिकांचे अभिनंदन केले.

कृषी पदवीधरांनी प्रशासकीय सेवेत जाण्याऐवजी आपल्या क्षेत्रातच अर्जित ज्ञानाचा उपयोग करावा असं आवाहन करताना जगभरात कृषी, दुग्ध व्यवसाय आदी क्षेत्रातील कृषी तज्ज्ञांची मोठी मागणी असल्याचे देखील राज्यपालांनी सांगितले.

यंदापासून महिला शेतकऱ्यांचा सन्मान करणार : कृषिमंत्री दादाजी भुसे

शेतीमध्ये महिला शेतकऱ्यांचे योगदान फार मोठे आहे. कृषी विद्यापीठांमध्ये देखील महिला विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे आहे असे नमूद करून सन २०२२ या वर्षांपासून शासनातर्फे महिला शेतकऱ्यांचा देखील सन्मान केला जाईल अशी माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दीक्षांत समारोहात प्रत्यक्ष सहभागी होताना दिली.

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये विद्यार्थिनींच्या प्रमाणात सर्व सुविधायुक्त वसतिगृहे निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी क्षेत्रातील युवा शास्त्रज्ञांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगताना शेती या विषयाचा समावेश शालेय शिक्षणात करण्याच्या दृष्टीने विचार विनिमय सुरु असल्याचे भुसे यांनी सांगितले. कृषी पदवीधरांनी उत्तम शेती करून आदर्श निर्माण करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

इतर बातम्या :

Hariyana Murder : सोनीपतमध्ये पत्नीच्या हत्येची साक्ष देण्यासाठी गेलेल्या पतीची न्यायालयाच्या आवारात गोळ्या घालून हत्या

IPL 2022 KKR vs GT Prediction Playing XI : गुजरातच्या कर्णधाराचं कमबॅक!, कप्तान श्रेयस व्येंकटेश अय्यरला विश्रांती देणार?

Aurangabad | राणा दाम्पत्याला आमचे शिवसैनिक पायही ठेवू देणार नाहीत, शिवसेना नेते Chandrakant Khaire यांचं वक्तव्य