Corona : नगरमध्ये 9 जणांचा कोरोनाची लागण, जिल्ह्यातील संख्या 17 वर

| Updated on: Apr 02, 2020 | 10:13 PM

जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 17 वर गेली आहे. तर 17 पैकी 10  हे निजामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभागी झाले होते

Corona : नगरमध्ये 9 जणांचा कोरोनाची लागण, जिल्ह्यातील संख्या 17 वर
Follow us on

अहमदनगर : अहमदनगरला गुरुवारी दोन परदेशी (Ahmadnagar Corona Virus Update) नागरिकांसह 9 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 17 वर गेली आहे. तर 17 पैकी 10  हे निजामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभागी झाले होते, परिस्थितीचे गांभीर्य ओळखा आणि सार्वजनिक संपर्क टाळा, असे अधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्हावासियांना  (Ahmadnagar Corona Virus Update) आवाहन केले आहे.

विशेष म्हणजे आज कोरोनाबाधित आढळलेल्या 9 जणांमध्ये दोन परदेशी व्यक्ती असून दोनजण संगमनेर येथील तर आणखी दोन जण मूळचे कोटा (राजस्थान) आणि भोपाळ (मध्य प्रदेश) येथील आहेत. हे सध्या नगर शहरातील मुकुंदनगर येथे राहात होते. तर इतर तिघांपैकी दोन संगमनेर तर एक जामखेडमधील आहे. मुकुंदनगर येथे राहणारे हे दोघे या परदेशी व्यक्तींचे भाषांतरकार म्हणून काम करीत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.

हेही वाचा : Corona : होम क्वारंटाईनचा शिक्का पुसून थेट बाजारपेठेत, बेजबाबदार तरुण पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान, नागरिकांनी आता परिस्थितीचे गांभीर्य ओळखण्याची गरज आहे. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क आहे, मात्र, नागरिकांनी आता (Ahmadnagar Corona Virus Update) नियमांचे पालन करावे आणि घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, आतापर्यंत आरोग्य यंत्रणेने 437 व्यक्तींचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील 356 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 17 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी एका रुग्णाचा अहवाल 14 दिवसानंतर निगेटिव्ह आल्याने त्याला घरी सोडण्यात आले होते. उर्वरित रुग्णांना आता बूथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाने आता बाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेणे, त्यांचे स्त्राव तपासणीसाठी पाठवणे याला प्राधान्य दिले आहे. आतापर्यंत 490 हून अधिक व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. सध्या अजून 58 जणांचे अहवाल येणे बाकी असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी सांगितले. सध्या आढळलेल्या बाधित रुग्णांची तब्बेत स्थिर (Ahmadnagar Corona Virus Update) असल्याचे त्यांनी सांगितले.