AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akola accident | अकोल्यात होंडा सिटी आणि ट्रकची धडक, पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू

अकोल्यातील राष्ट्रीय महामार्गावरील अमरावती मूर्तिजापूर रोडजवळील नागोली नागठाणा गावात हा भीषण अपघात (Akola Car And Truck Accident) झाला. 

Akola accident | अकोल्यात होंडा सिटी आणि ट्रकची धडक, पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
| Updated on: Jul 20, 2020 | 5:13 PM
Share

अकोला : अकोल्यात कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला (Akola Car And Truck Accident) आहे. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अकोल्यातील राष्ट्रीय महामार्गावरील अमरावती मूर्तिजापूर रोडजवळील नागोली नागठाणा गावात हा भीषण अपघात झाला.

अकोल्यातील नागठाणा फाट्याजवळ नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या MH 04 – BW – 5259 क्रमांकाच्या होंडा सिटी कारला अमरावतीकडे जाणाऱ्या MH15- FV -1413 क्रमाकांच्या ट्रकनं जबर धडक दिली. या धडकेत कारमधील सर्व जण बाहेर फेकले गेले. तर कारचा समोरील भाग चक्काचूर झाला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

या अपघातात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर आहेत. हुसेन गुलाम हुसेन, साबीया हुसेन हबीब आणि हुसेन हबीब मोहम्मद हबीब अशी जखमींची नावे आहेत.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

त्यांच्यावर मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. तसेच पुढील उपचारासाठी त्यांना अकोल्यातील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान हा अपघात नेमका कसा घडला याचा तपास पोलीस करत (Akola Car And Truck Accident) आहेत.

संबंधित बातम्या : 

Bhanushali building collapse Live Update | भानुशाली इमारत दुर्घटना, एनडीआरएफच्या मदतीला श्वानपथक

नाशिकमधील धोकादायक वाड्यांचा प्रश्न ऐरणीवर, 1 हजार 32 जुन्या वाड्यांना नोटीस

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...