Ram Setu | अक्षय कुमारकडून चाहत्यांना खास भेट, दिवाळीच्या मुहूर्तावर ‘राम सेतू’ची पहिली झलक प्रदर्शित!

दिवाळीचा खास मुहूर्त साधत आज (14 नोव्हेंबर) अक्षय कुमारने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

Ram Setu | अक्षय कुमारकडून चाहत्यांना खास भेट, दिवाळीच्या मुहूर्तावर ‘राम सेतू’ची पहिली झलक प्रदर्शित!

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारने (Akshay Kumar) आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या निमित्ताने एक खास भेट देऊ केली आहे. दिवाळीचा खास मुहूर्त साधत आज (14 नोव्हेंबर) अक्षय कुमारने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. अक्षय कुमारने आगामी नवीन चित्रपट ‘राम सेतू’ची (Ram Setu) घोषणा करत, चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित केली आहे (Akshay Kumar release upcoming film Ram setu first poster).

अक्षय कुमारने ट्विटरवर फ्रोम्या नव्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करत आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या चित्रपटात अक्षय एका प्रवाशाची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाच्या या पोस्टरमध्ये अक्षय एका वेगळ्या रूपात दिसून येत आहे. पोस्टरमध्ये अक्षयच्या मागे भगवान श्री रामाची प्रतिमा दिसून येत आहे. तसेच या चित्रपटात पुन्हा एकदा अक्षय कुमार लांब केसांमध्ये दिसणार आहे.

अक्षय कुमारचे ट्विट

ट्विटरवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत अक्षय कुमारने लिहिले आहे की, ‘भारताचे आदर्श आणि महानायक भगवान श्रीरामाच्या पुण्य स्मृतींना युगानुयुगे भारतीयांच्या मनामध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी असा एक सेतू बनवला जाईल, जो येणाऱ्या पिढीला रामासोबत जोडून ठेवील. याच प्रयत्नात आमचा एक छोटासा संकल्प-राम सेतू, आपणा सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा.’

अक्षय कुमारने ‘राम सेतू’ चित्रपटाचे दोन पोस्टर प्रदर्शित केले आहेत. यातील एक हिंदी आहे, तर दुसरे इंग्रजीमध्ये आहे. अर्थातच पोस्टर प्रदर्शित होताच अक्षयच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढलेली आहे (Akshay Kumar release upcoming film Ram setu first poster).

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा चित्रपट 9 नोव्हेंबरला ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. ‘लक्ष्मी’ चित्रपटाने ओटीटीवर एका दिवसात सर्वात अधिक वेळा पहिल्या गेलेल्या चित्रपटांचे विक्रम तोडलेल आहेत. याआधी हा विक्रम दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ‘दिल बेचारा’ या चित्रपटाच्या नावावर होता. ‘लक्ष्मीनंतर आता अक्षयच्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार आहे.

‘लक्ष्मी’चा वाद

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘लक्ष्मी’मुळे (Laxmii) चांगलाच चर्चेत आहे. ‘लक्ष्मी’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच अनेक वादांत अडकला होता. चित्रपटाचे प्रमोशन जबरदस्त मार्गाने सुरू होते, पण चित्रपटाच्या शीर्षकावरून सुरू झालेला वाद काही केल्या शमत नव्हता. या शीर्षकामुळे चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी सुरू झाली होती. अखेर हा शीर्षक वाद मिटावा म्हणून या चित्रपटाचे नावच बदलण्यात आले आहे. चित्रपटाचे नाव ‘लक्ष्मी बॉम्ब’ वरून आता केवळ ‘लक्ष्मी’ करून चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. लवकरच तो ‘बेलबॉटम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

(Akshay Kumar release upcoming film Ram setu first poster)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI