हापूस प्रेमींसाठी चिंतेची बातमी, लांबलेल्या पावसाने यंदा हापूसची चव चाखायला वाट पहावी लागणार

| Updated on: Nov 27, 2020 | 5:17 PM

आंबा खवय्यांसाठी एक चिंतेत टाकणारी बातमी आहे. यंदा फळांचा राजा हापूस खाण्यासाठी खवय्यांना वाट पहावी लागणार आहे.

हापूस प्रेमींसाठी चिंतेची बातमी, लांबलेल्या पावसाने यंदा हापूसची चव चाखायला वाट पहावी लागणार
Follow us on

सिंधुदुर्ग : आंबा खवय्यांसाठी एक चिंतेत टाकणारी बातमी आहे. यंदा फळांचा राजा हापूस खाण्यासाठी खवय्यांना वाट पहावी लागणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात थंडीला सुरुवात झाल्याने आंबा मोहोरासाठी पोषक वातावरण बनले आहे; पण लांबलेल्या पावसामुळे झाडांना पालवी आल्याने यंदाही हापूसचा हंगाम लांबण्याची शक्‍यता आहे. झाडांना आलेली पालवी टिकवून ठेवण्यासाठी बागायतदारांचे प्रयत्न सुरू झाले आहेत (Alphonso Mango may take more time to available in Market due to late rain).

यंदा पावसाचे प्रमाण सुरुवातीपासून समाधानकारक राहिले; मात्र अवकाळी पावसाने ऑक्‍टोबरपर्यंत हजेरी लावली. भातशेतीच्या दृष्टीने अखेरचा पाऊस अडचणीचा ठरला. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना अडचणीत आणल्याचे चित्र होते. पाऊस लांबल्याने आंबा हंगाम यंदा लांबणीवर जाण्याची अंदाज बांधला जात आहे. पाऊस उशिरापर्यंत राहिल्याने आंबा कलमांना आता पालवी फुटली आहे. मोठ्या प्रमाणात झाडांना पालवी आली आहे.

कलमांना आलेली पालवी जाऊन त्यामधून मोहोर बाहेर येण्यास काही कालावधी जावा लागणार आहे. असं असलं तरी काही झाडांवर किरकोळ प्रमाणात मोहोर दिसतो आहे. मात्र बहुतांशी झाडांना पालवी फुटली आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम लांबण्याची शक्‍यता आंबा बागायतदार व्यक्त करत करत आहे. दुसरीकडे मोहोर आल्यामुळे हापूस उशिरा येईल. त्यामुळे हापूसला दर मिळणार नसल्याचे बागायतदार वैभव घाडी यांनी सांगितले. सध्या पालवी आलेली फांदी जोपर्यंत जूनी होत नाही, तोपर्यंत तिला मोहोर येणार नाही. त्यामुळे यावर्षी आंबा हंगाम पुढे जाईल असं दिसतंय.

संबंधित बातम्या :

दोन वर्षापूर्वी 2 आंबे चोरले, तरुणावर 96 हजारांचा दंड

ठाण्यात आंब्याच्या स्टॉलवरुन मनसे आणि भाजपचे कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

पुणे तिथे काय उणे… पुण्यात आंबे खाण्याची स्पर्धा

व्हिडीओ पाहा :

Alphonso Mango may take more time to available in Market due to late rain