AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : ठाण्यात आंब्याच्या स्टॉलवरुन मनसे आणि भाजपचे कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात मनसे आणि भाजप या पक्षांमधील वाद चांगलाच पेटलेला दिसतो आहे. नुकत्याच ठाण्यात आयोजित केलेल्या शेतकरी ते थेट ग्राहक या अंतर्गत मनसेतर्फे आंब्याचा एक स्टॉल लावण्यात आला होता.  मात्र हा स्टॉल अनधिकृत असून तो लवकरात लवकर हटवा अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी पालिकेकडे केली. या कारणामुळे मनसे आणि भाजपचे कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. […]

VIDEO : ठाण्यात आंब्याच्या स्टॉलवरुन मनसे आणि भाजपचे कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा
| Updated on: Jul 05, 2019 | 3:46 PM
Share

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात मनसे आणि भाजप या पक्षांमधील वाद चांगलाच पेटलेला दिसतो आहे. नुकत्याच ठाण्यात आयोजित केलेल्या शेतकरी ते थेट ग्राहक या अंतर्गत मनसेतर्फे आंब्याचा एक स्टॉल लावण्यात आला होता.  मात्र हा स्टॉल अनधिकृत असून तो लवकरात लवकर हटवा अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी पालिकेकडे केली. या कारणामुळे मनसे आणि भाजपचे कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. यावेळी मनसेतर्फे काही वेळ रस्ता रोकोही करण्यात आला.

सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यातील मुंबई, ठाणे, रायगड या ठिकाणच्या लोकसभा जागांवरील मतदान पार पडलं. मतदानानंतर सर्वत्र राजकीय वातावरण शांत असताना ठाण्यात आज अचानक मनसे आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.

ठाण्यातील नौपाडा येथे शेतकरी ते ग्राहक या कार्यक्रमातंर्गत मनसेतर्फे एका शेतकऱ्याने रस्त्यावर आंब्याचा स्टॉल लावला होता. मात्र हा स्टॉल अनधिकृत असून यामुळे नागरिकांना चालण्यास त्रास होतो. त्यामुळे हा आंब्याचा स्टॉल लवकरात लवकर हटवा अशी मागणी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी केली. मात्र या स्टॉलच्या शेजारी असलेल्या अनधिकृत गाळा आधी हटवा, नंतर आम्ही आंब्याचा स्टॉल हटवतो अशी भूमिका मनसेच्या कार्यकर्त्यांनी घेतली.

यानंतर भाजपने मनसेच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करत राज ठाकरे हाय हायच्या घोषणा दिला. तर मनसेच्या कार्यकर्त्यांनीही चौकीदार चोर हे अस म्हणतं भाजपविरोधात घोषणाबाजी केली. या प्रकरणानंतर ठाणे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसंच सध्या या ठिकाणी ठाणे महापालिका अतिक्रमण विभाग उपस्थित आहे. मात्र निवडणुकीच्या धामधूमीनंतर आंब्याच्या एका स्टॉलवरुन मनसे आणि भाजपमधील कार्यकर्त्यांमधील वादावर पक्षातील वरिष्ठ काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.