आंबेनळी घाट बस दुर्घटना : तपास थांबवण्यासाठी रायगड पोलिसांची कोर्टाला विनंती

आंबेनळी घाटात बस कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या वर्षभरानंतर पोलिसांच्या हाती ठोस असं काहीच लागलं नाही. त्यामुळे रायगड पोलिसांनी न्यायालयात याप्रकरणाचा तपास थांबवण्याची परवानगी मागितली आहे.

आंबेनळी घाट बस दुर्घटना : तपास थांबवण्यासाठी रायगड पोलिसांची कोर्टाला विनंती
Follow us
| Updated on: Jul 18, 2019 | 10:31 AM

रत्नागिरी/ रायगड : रायगड जिल्ह्यातील पोलादपूरजवळच्या आंबेनळी घाटात बस कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या वर्षभरानंतर पोलिसांच्या हाती ठोस असं काहीच लागलं नाही. त्यामुळे रायगड पोलिसांनी न्यायालयात याप्रकरणाचा तपास थांबवण्याची परवानगी मागितली आहे. कोकण कृषी विद्यापीठाच्या सहलीच्या बसला आंबेनळी घाटात अपघात झाला होता. खोल दरीत बस कोसळून या बसमधील 30 जणांचा मृत्यू झाला होता. 28 जुलै 2018 रोजी ही भीषण दुर्घटना झाली होती.

याप्रकरणी अपघातातून वाचलेले एकमेव प्रकाश सावंतदेसाई यांच्यावर मृत नातेवाईकांनी संशय व्यक्त केला होता. मात्र त्यांची कुठलीही चौकशी न करता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास बंद करण्याची परवानगी मागितली आहे. न्यायालयात सादर केलेल्या पत्राची प्रत टीव्ही 9 च्या हाती लागली आहे. यासंदर्भातील पत्र न्यायालयाने स्वीकारलं आहे.

पोलिसांनी कोकण कृषी विद्यापीठाचे चालक प्रवीण भांबेड यांनी बेदरकारपणे गाडी चालवल्याचा दावा न्यायालयात केला आहे. प्रवीण भांबेड यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास थांबवण्याची परवानगी न्यायलयाकडे मागितली आहे. मात्र पोलिसांच्या या पवित्र्यामुळे अपघातातील मृतांचे नातेवाईक नाराज झाले आहे.

अपघातातून एकमेव बचावलेले प्रकाश सावंतदेसाई यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी, मृतांचे नातेवाईक आजही करत आहेत. पोलीस तपास थांबवला जावू नये अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी न्यायायलात केली आहे.

सहा महिन्यांनी गुन्हा

आंबेनळी घाटात झालेल्या बस अपघातप्रकरणी जवळपास सहा महिन्यांनी म्हणजेच जानेवारी महिन्यात पहिला गुन्हा दाखल झाला होता.  30 जणांचा मृत्यू झालेल्या या भीषण दुर्घटनेप्रकरणी, मृत बसचालकाविरोधात गुन्हा  दाखल करण्यात आला होता. मृत बसचालक प्रवीण भांबेड यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला होता. 28 जुलै 2018 रोजी पोलादपूर-महाबळेश्वर राज्य मार्गावर कोकण कृषी विद्यापीठाच्या बसला भीषण अपघात झाला होता. बस आंबेनळी घाटात कोसळून विद्यापीठाचे 30 कर्मचारी जागीच ठार झाले होते. तर या अपघातातून एकमेव प्रकाश सावंत देसाई हे एकमेव बचावले होते.

प्रकाश सावंत देसाई  आश्चर्यकारकरित्या बचावले

या अपघातात बसचा चेंदामेंदा झाला. बसमधील 31 पैकी 30 जणांचा जागीच मृत्यू झाला. मात्र या बसमधील प्रकाश सावंत देसाई हे आश्चर्यकारकरित्या बचावले. प्रकाश सावंत देसाई हे खोल दरीतून वर आले आणि त्यांनी मोबाईलवरुन विद्यापीठातील अधिकाऱ्यांना बस अपघाताची माहिती दिली.

प्रकाश सावंतदेसाईंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

दरम्यान, अपघातातील मृतांच्या नातेवाईकांनी बचावलेल्या प्रकाश सावंतदेसाईंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आंबेनळी घाटातील अपघात हा नियोजनबद्ध कट असावा, अशा भावना नातेवाईकांच्या आहेत. तसेच आंबेनळी अपघातात बचवलेला प्रकाश सावंत देसाई हाच या अपघाताला जबाबदार असल्याचा आरोप नागरिक आणि नातेवाईकांचा आहे.

संबंधित बातम्या  

आंबेनळी घाट दुर्घटनेप्रकरणी पहिला गुन्हा दाखल  

अंबेनळी बस अपघात : प्रकाश सावंत देसाईंवर गुन्हा दाखल करण्यासाठी दापोलीकर आक्रमक  

Non Stop LIVE Update
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.