अंबेनळी बस अपघात : प्रकाश सावंत देसाईंवर गुन्हा दाखल करण्यासाठी दापोलीकर आक्रमक

रत्नागिरी : अंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात दापोली कृषी विद्यापीठाची बस दरीत कोसळून 30 कर्मचारी मृत्यूमुखी पडले होते. या अपघातातून बचावलेले प्रकाश सावंत देसाई यांच्यावर मृतांचे नातेवाईक आणि नागरिकांनी संशय व्यक्त केला असून, बसचे चालक मृत प्रशांत भांबिड यांच्यावर पोलादपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने सर्व पक्षीय नेत्यांसह नागरिक आक्रमक झाले आहेत. आमदार सजंय कदम, माजी …

अंबेनळी बस अपघात : प्रकाश सावंत देसाईंवर गुन्हा दाखल करण्यासाठी दापोलीकर आक्रमक

रत्नागिरी : अंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात दापोली कृषी विद्यापीठाची बस दरीत कोसळून 30 कर्मचारी मृत्यूमुखी पडले होते. या अपघातातून बचावलेले प्रकाश सावंत देसाई यांच्यावर मृतांचे नातेवाईक आणि नागरिकांनी संशय व्यक्त केला असून, बसचे चालक मृत प्रशांत भांबिड यांच्यावर पोलादपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने सर्व पक्षीय नेत्यांसह नागरिक आक्रमक झाले आहेत. आमदार सजंय कदम, माजी आमदार सूर्यंकांत दळवी, खेड नगरपालिका नगराध्यक्ष वैभव खेडेकर, केदार साठे, भाऊ ईदाते, ऋषी गुजर आणि इतर राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत मृतांच्या नातेवाईकांनी पोलादपूर पोलीस स्टेशनला घेराव घालून आपल्या मागण्याचे निवेदन दिले. न्याय न भेटल्यास दापोलीमध्ये सर्व पक्षीय मोर्चा काढून पोलादपूर पोलिसांच्या पक्षपाती तपासाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला.

पोलादपूरमधील आंबेनळी घाटात 28 जुलै 2018 रोजी दापोली कृषी विद्यापीठाच्या बसचा अपघात झाला आणि विद्यापीठाचे 30 कर्मचारी या अपघातात मृत्युमुखी पडले होते.  या घटनेला सहा महिने उलटले आहेत. या अपघाताबाबत अनेक संशय व्यक्त केले जात होते. या अपघातानंतर पाच महिने उलटून गेले तरीदेखील पोलीस यंत्रणेला तपास काहीही हाती लागलेले नाही. दरम्यान चार दिवसापूर्वी या अपघाताबाबत मृत बस चालक प्रशांत भांबिड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे सर्व मृतांचे नातेवाईक व दापोलीकर प्रचंड संतप्त झाले आहेत. त्यामुळे दापोली कृषी विद्यापीठाच्या आंबेनळी घाटातील अपघाताच्या संदर्भात मृतांचे नातेवाईक आणि सर्व पक्षीय राजकीय नेत्यांसह अपघातातून बचावलेल्या सावंत देसाईवर गुन्हा दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने पोलादपूर येथे पोलीस चौकीत दाखल झाले.

आंबेनळी घाटातील अपघात हा नियोजनबद्ध कट असावा, अशा भावना यावेळी नातेवाईकांनी व्यक्त केल्या. तसेच आंबेनळी अपघातात बचवलेला प्रकाश सावंत देसाई हाच या अपघाताला जबाबदार असल्याचा आरोप यावेळी नागरिक आणि नातेवाईकांकडून करण्यात आला. त्याचबरोबर या अपघातात पाच महिने उलटून देखील प्रकाश सावंत देसाई याला अटक करुन त्याबाबतीत कारवाई करण्यात शासनाला यश आले नाही असा तीव्र संताप नातेवाईकांनी व्यक्त केला.

तसेच, सावंत देसाई यांनीच हा अपघात जाणीवपूर्वक घडवला असा त्याच्यावर गुन्हा नोंदवून अटक करावी, तसेच त्याची नार्को टेस्ट घेतली जावी. शिवाय, अपघातामागच्या सत्याचा शोध घ्यावा आणि मृत ड्राईव्हर प्रशांत भांबीड हा निर्दोष असल्याची सर्वाना खात्री असल्याने त्याच्यावर नोंदणी केलेला गुन्हा मागे घ्यावा, असे संतप्त निवेदन दापोलीकारांनी डीवायएसपी अरविंद पाटील आणि पीआय प्रकाश पवार यांना सादर केले. तसेच, 26 जानेवारीपर्यंत कारवाई करावी, अन्यथा दापोलीकर संताप मोर्चा काढतील. तसेच वेळ पडल्यास मुख्यमंत्र्यांसमोर जाऊन न्याय मिळेपर्यंत ठिय्या ठोकू, अशा संतप्त भावना व्यक्त केल्या.

यावेळी दापोलीचे विद्यमान आमदार संजय कदम, माजी आमदार सूर्यकांत दळवी, मनसेचे कोकण विभागीय नेते व खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर, केदार सार्डा, श्रीराम विध्वरे, रमेश पांगत, किशोर देसाई, ॠषी गुजर, पत्रकार चंद्रशेखर जोशी व पत्रकार जितेंद्र गावडे यांचा सह सर्व पक्षीय नेते व मृतांचे कुटुंबिय व शेकडो दापोलीकर हे यावेळी आपल्या संतप्त भावना मांडण्यासाठी उपस्थित राहीले होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *