AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित शाहांची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, लॉकडाऊनबाबत चर्चा

गृहमंत्री अमित शाह यांनी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत आज (28 मे) एकत्र बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे (Amit Shah discussed with CM of all states).

अमित शाहांची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, लॉकडाऊनबाबत चर्चा
| Updated on: May 29, 2020 | 12:08 AM
Share

नवी दिल्ली : गृहमंत्री अमित शाह यांनी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत आज (28 मे) एकत्र बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे (Amit Shah discussed with CM of all states). या बैठकीत त्यांनी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली.

देशात सध्या 31 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. अमित शाह यांनी लॉकडाऊन वाढवण्याबाबत सर्व मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. देशात 31 मे नंतर लॉकडाऊन वाढवलं तर त्याच्या गाईडलाईन्स काय असाव्यात, याबाबतही बैठकीत चर्चा झाली (Amit Shah discussed with CM of all states).

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 मे रोजी ‘मन की बात’ या कार्यक्रमात देशात लॉकडाऊन वाढवला जाणार की नाही, यावर स्पष्टीकरण  देण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊन वाढवण्याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाचं स्पष्टीकरण

केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाऊनच्या पाचव्या सत्राबाबत सुरु असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. लॉकडाऊन 5.0 बाबतचे सर्व दावे खोटे आहेत, असं स्पष्टीकरण गृह मंत्रालयाने दिलं आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून लॉकडाऊनची रुपरेषा ठरवली जाते, असं गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

‘या’ शहरांमध्ये लॉकडाऊन वाढण्याची शक्यता

मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरु, ठाणे, इंदौर, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, सुरत आणि कोलकाता या 11 शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. भारतातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 70 टक्के रुग्ण या शहरांमध्ये आहेत. त्यामुळे या शहरांमध्ये लॉकडाऊन शिथिलताची शक्यता कमी आहे.

देशात पाचव्या सत्रातील लॉकडाऊन घोषित झालं तर ज्या भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे, त्याभागात सूट दिली जाऊ शकते. मात्र, त्यासाठी काही अटी आणि शर्तीदेखील ठेवण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

चीन आणि आम्ही बघून घेऊ, मध्यस्थाची गरज नाही, भारताचं ट्रम्प यांना उत्तर

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 2,598 रुग्णांची भर, आकडा 59,546 वर

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.