चीन आणि आम्ही बघून घेऊ, मध्यस्थाची गरज नाही, भारताचं ट्रम्प यांना उत्तर

भारत-चीनमधील सीमा वादावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थता करण्याची तयारी दाखवली. यानंतर भारताने यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना या प्रकरणी कोणत्याही मध्यस्थाची गरज नसल्याचं स्पष्ट केलं आहे (India reply to Donald trump on China issue).

चीन आणि आम्ही बघून घेऊ, मध्यस्थाची गरज नाही, भारताचं ट्रम्प यांना उत्तर
Follow us
| Updated on: May 28, 2020 | 11:28 PM

नवी दिल्ली : भारत-चीनमधील सीमा वादावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थता करण्याची तयारी दाखवली. यानंतर भारताने यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना या प्रकरणी कोणत्याही मध्यस्थाची गरज नसल्याचं स्पष्ट केलं आहे (India reply to Donald trump on China issue). तसेच भारत आणि चीन शांततापूर्ण मार्गाने या मुद्द्यावर उत्तर शोधेल. आम्ही चीनशी चर्चा करत आहोत, अशी भूमिका भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करत म्हटले होते, “अमेरिका भारत आणि चीनमधील सीमा वादात मध्यस्थता करण्यास तयार आहे. आम्ही भारत आणि चीन दोन्ही देशांना याबाबत कळवले आहे. दोन्ही देशांची इच्छा असेल तर अमेरिका मध्यस्थीसाठी तयार आहे.” दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील वर्षी भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव तयार झाला असताना देखील अशाचप्रकारे मध्यस्थीची तयारी दर्शवली होती. तेव्हा देखील भारताने काश्मीर भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय मुद्दा असल्याचं सांगत यात मध्यस्थाची आवश्यकता नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी नेपाल आणि चीनसोबतच्या सध्याच्या संबंधांवर माहिती दिली. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, “भारत आणि नेपाळचे संबंध घनिष्ठ आहेत. कोरोना महामारीच्या काळातही आम्ही विना परवाना व्यापार सुनिश्चित केला आहे. आम्ही सीमा प्रश्नावर नेपाळमध्ये जी स्थिती आहे त्यावर लक्ष ठेऊन आहोत. परस्पर समंजसपणा आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन भारताचे दरवाजे नेहमीच आपल्या शेजारी राष्ट्रांसाठी खुले राहिले आहेत.”

सीमेवर चीनसोबतच्या संघर्षावर ते म्हणाले, “भारताच्या सैनिकांनी सीमारेषेच्या सुरक्षेबाबत अत्यंत जबाबदार भूमिका घेतली आहे. भारतीय सैनिकांनी दोन्ही देशांमधील सर्व प्रोटोकॉलचं कठोर पालन केलं आहे. देशाच्या नेतृत्वाने केलेल्या मार्गदर्शनाचं भारतीय सैन्य प्रामाणिकपणे पालन करत आहे. यासोबतच भारत आपली सार्वभौमता आणि अखंडता याचे संरक्षण करत राहिल.”

नेपाळसोबतचा वाद काय?

नेपाळ सरकारने नवा नकाशा प्रकाशित केला होता. यात कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा या भारताचा भाग नेपाळचा भाग म्हणून दाखवण्यात आलं होतं. नेपाळच्या भूमी संसाधन मंत्रालयाने कॅबिनेट बैठकीत नेपाळचा नवा नकाशा जाहीर केला होता. भारताने यावर कठोर आक्षेप घेतला होता. यानंतर नेपाळने हा नकाशा नेपाळच्या संसदेत मंजूर करण्याचा प्रस्ताव मागे घेतला.

चीनसोबतचा वाद काय?

चीनने भारत-चीन सीमेवर असलेल्या गालवान नदीजवळ आपल्या सैनिकांची वाहतूक आणि सामानाचा पुरवठा यासाठी अनेक रस्ते बनवले आहेत. हेच पाहून भारताच्या सीमा रस्ते विभागाने देखील त्या भागात रस्ते निर्मितीला वेग दिला. यानंतर चीन बिथरल्याचं पाहायला मिळालं. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच लडाखमध्ये चिनी सैनिक आणि भारतीय सैनिक यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला. चीनकडून सीमारेषेवर सातत्याने सैनिकांच्या संख्येत वाढ केली जात आहे. 6-7 मे रोजी चीन आणि भारताच्या सैनिकांमध्ये वादही झाला. यानंतरच पूर्व लडाख सीमेवर सातत्याने तणाव निर्माण झाला आहे.

हेही वाचा :

बांधकाम क्षेत्राला मदत करा, शरद पवाराचं पंतप्रधान मोदींना चौथं पत्र

जवळपास 5 कोटी भारतीयांचा Truecaller डेटा डार्क वेबवर लीक, ऑनलाईन इंटेलिजन्सचा दावा

India reply to Donald trump on China issue

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.