महानायकाची महामदत, मजुरांसाठी थेट तीन विमानं बूक, 500 मजुरांना पाठवणार

अमिताभ बच्चन यांनी वाराणसीच्या 500 स्थलांतरित मजुरांना घरी पोहोचवण्यासाठी तीन विमानं बुक केली आहेत (Amitabh Bachchan help migrant workers).

महानायकाची महामदत, मजुरांसाठी थेट तीन विमानं बूक, 500 मजुरांना पाठवणार
फोटो सौजन्य : फेसबुक
Follow us
| Updated on: Jun 10, 2020 | 8:08 PM

मुंबई : अभिनेता सोनू सूद पाठोपाठ आता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन देखील स्थलांतरित मजुरांच्या मदतीसाठी (Amitabh Bachchan help migrant workers) पुढे सरसावले आहेत. अमिताभ बच्चन यांनी वाराणसीच्या 500 स्थलांतरित मजुरांना घरी पोहोचवण्यासाठी तीन विमानं बुक केली आहेत. यापैकी पहिलं विमान आज (10 जून) सकाळी 6 वाजेच्या सुमारास 180 मजुरांना घेऊन वाराणसीच्या दिशेला रवाना झालं. दुसरे दोन विमानंदेखील आजच रवाना होणार आहेत. मात्र, त्याबाबत संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही.

अमिताभ बच्चन यांच्या एबी कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश यादव आणि त्यांचे इतर सहकारी यांच्या निदर्शनाखाली मजुरांना आपापल्या राज्यात पाठवण्याचं नियोजन सुरु आहे. याबाबच ‘मिडे डे’ वृत्तपत्राने सुत्रांच्या हवाल्याने माहिती दिली आहे (Amitabh Bachchan help migrant workers) .

“सर्व नियोजन अत्यंत सावधगिरीने केलं जात आहे. कारण अमिताभ बच्चन यांना पब्लिसिटी नकोय. स्थलांतरित मजुरांची दुर्दशा पाहून अमिताभ बच्चन स्वत:ला रोखू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी स्थलांतरित मजुरांना घरी जाण्यासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला”, असं सुत्रांनी सांगितलं.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांनी वाराणसीला जाणारं इंडिगो फ्लाइट भाड्याने घेतलं. या फ्लाइटने 180 प्रवाशांना वाराणसीत पाठवण्यात आलं. या मजुरांना सुरुवातीला ट्रेनने पाठवण्याचा विचार होता. मात्र, काही कारणास्तव ते होऊ शकलं नाही. दरम्यान, अमिताभ बच्चन पश्चिम बंगाल, बिहार, तमिळनाडू आणि इतर राज्यांच्या स्थलांतरित मजुरांची देखील व्यवस्था करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

अमिताभ बच्चन यांनी याअगोदर 29 मे रोजी उत्तर प्रदेशच्या स्थलांतरित मजुरांची बसने घरी जाण्याची व्यवस्था केली होती. त्यांनी माहिम दर्गा ट्रस्ट आणि हाजी अली दर्गा ट्रस्ट सोबत 10 बसमधून 250 मजुरांना आपापल्या राज्यात जाण्याची व्यवस्था केली होती. या दहा बसमध्ये मजुरांच्या जेवणाची आणि मेडिकल किटबाबतच्या सर्व सुविधा होत्या.

अमिताभ बच्चन यांचं गेल्या दोन महिन्यांपासून गरिबांना मदत करण्याचं काम सुरु आहे. ते विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने मुंबईच्या विविध भागातील सर्वसामान्य गरिब कुटुंबांना खाद्य पदार्थांचे पॅकेट्स वाटत आहेत. बच्चन यांच्या कंपनीने आतापर्यंत 1000 कुटुंबांना रेशन पॅकेट्स दिले आहेत. हे रेशन पॅकेट प्रत्येक कुटुंबाला एक महिनाभर पुरतं. याशिवाय अमिताभ बच्चन यांच्याकडून आतापर्यंत 2000 रेशन पॅकेट्स, 2000 पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, 1200 चपलांचे जोडे स्थलांतरित मजुरांना वाटण्यात आलं आहे.

हेही वाचा :

Oxford सारख्या विद्यापीठांनी परीक्षा रद्द केल्या, पण आपल्या राज्यपालांचं ज्ञान मोठं : शरद पवार

मुंबईतील रुग्णालयातून मृतदेह गायब, आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणतात…

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.