AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समुद्राशी संबंध नसलेल्या फडणवीसांच्या ज्ञानात भर पडेल, कोकण दौऱ्यावरुन पवारांचा टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कोकण दौऱ्यावरुन टोलेबाजी केली आहे (Sharad Pawar criticized Devendra Fadnavis on Kokan Visit).

समुद्राशी संबंध नसलेल्या फडणवीसांच्या ज्ञानात भर पडेल, कोकण दौऱ्यावरुन पवारांचा टोला
| Updated on: Jun 10, 2020 | 7:34 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कोकण दौऱ्यावरुन टोलेबाजी केली आहे (Sharad Pawar criticized Devendra Fadnavis on Kokan Visit). “मी बारामतीसारख्या दुष्काळी भागातून येतो. देवेंद्र फडणवीस विदर्भातून येतात. समुद्राशी काहीही संबंध नाही. त्यामुळे ते येत आहेत, तर चांगलं आहे. प्रत्येकाला ही परिस्थिती समजेल, ज्ञानात भर पडेल”, असं मत म्हणत शरद पवार यांनी उपरोधात्मक टोला लगावला. ते आपल्या कोकण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार यांनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त कोकण दौरा केला. त्यांनी 2 दिवस नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. शेतकरी आणि व्यवसायिकांच्या भेटी घेऊन त्यांचे प्रश्न समजू घेतले. यानंतर लगेचच भाजपचे नेते विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील कोकण दौऱ्याची घोषणा केली. यावरच पवारांनी निशाणा साधला आहे.

शरद पवार म्हणाले, “कोकणवासीयांच्या अपेक्षा पूर्ण होतील हे लक्षात घेऊ. मुख्यमंत्री सतत माहिती घेत आहेत. पालकमंत्री काम करत आहे. यातून काहीतरी होईल. एक दिवसात प्रश्न सुटणार नाही. लोकांनी धीर सोडला नाही, ते कामाला लागले आहेत. राज्यातील यंत्रणा संकटग्रस्तांच्या मागे उभी आहे. उद्या मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक होईल, त्यानंतर गरज असेल तर केंद्राशी पण चर्चा करु. मुख्यमंत्री हे प्रश्न घेऊन केंद्राकडे जातील. पर्यटन क्षेत्रासाठी वेगळी अधिकची मदत करण्याची गरज आहे. त्याबाबतही सरकारला सांगू.”

कोल्हापूर आणि सांगलीला पूर झाल्यावर सरकारने काही निकष बदलले होते. त्या निकषात पण अजून बदल करावे लागतील. अजून अर्थसहाय्य करावं लागेल. आम्ही पाहणी करताना उद्या बैठक ठरवली आहे. दोन्ही जिल्हा पालकमंत्री, अधिकारी बैठक होईल, असंही ते म्हणाले.

दरम्यान, राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असं चित्र असताना, पवारांनी राज्यपालांवर निशाणा साधला. ते म्हणाले, “राज्यात अनेक शिक्षण संस्था आहेत. कोरोनामुळे अनेक परीक्षा रद्द झाल्या आहेत. IIT ने परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. जगातील ख्यातनाम अशा ऑक्सफोर्ड विद्यापीठ, अन्य चांगल्या विद्यापीठांनी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. मात्र राज्यपालांचे ज्ञान अर्थात आपल्यापेक्षा मोठं असेल.” अगदीच कोणी काही चुकीचं केलं असा निष्कर्ष काढला असं मला वाटत नाही, असंही पवार म्हणाले.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारच्या परीक्षेऐवजी श्रेणीच्या निर्णयाला प्रलंबित ठेवत विद्यापीठ कायद्याप्रमाणे निर्णय होईल, अशी भूमिका घेतली आहे. याबाबत राज्यपालांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा विद्यापीठ कायद्याप्रमाणे घेण्यात येतील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निर्णय कळवलं आहे.

त्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षांची परीक्षेच्या पार्श्वभूमीवर 30 मे रोजी राज्यातील सर्व विद्यापीठातील कुलगुरुसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अंतिम वर्षासाठी सर्व वर्षांच्या सत्रांच्या सरासरी इतके गुण किंवा श्रेणी प्रदान करण्याची त्याशिवाय श्रेणी सुधारासाठी ऐच्छिक परीक्षेचा पर्याय देण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून पाहण्याची सूचना केली होती. मात्र राज्यपालांनी त्यावर आक्षेप घेऊन, परीक्षा घ्यायची की नाही हे विद्यापीठ कायद्याप्रमाणे ठरवू, असं म्हटलं होतं.

संबंधित बातम्या :

Oxford सारख्या विद्यापीठांनी परीक्षा रद्द केल्या, पण आपल्या राज्यपालांचं ज्ञान मोठं : शरद पवार

महाराष्ट्रात वादळातील नुकसानग्रस्तांना एनडीआरएफपेक्षा अधिक पटीने मदत : अजित पवार

Sharad Pawar criticized Devendra Fadnavis on Kokan Visit

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.