AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आनंद दिघे मृत्यू वाद: निलेश राणेंना दीपक केसरकरांचं उत्तर

सिंधुदुर्ग: खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी, शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूप्रकरणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आरोप केल्यानंतर, आता शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी निलेश राणेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं. “बाळासाहेबांवर आरोप करणाऱ्यांची डोकी तपासावी लागतील. बाळासाहेबांवर बोलण्याची यांची लायकी आहे का? कोणीही […]

आनंद दिघे मृत्यू वाद: निलेश राणेंना दीपक केसरकरांचं उत्तर
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM
Share

सिंधुदुर्ग: खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी, शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूप्रकरणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आरोप केल्यानंतर, आता शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी निलेश राणेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं.

“बाळासाहेबांवर आरोप करणाऱ्यांची डोकी तपासावी लागतील. बाळासाहेबांवर बोलण्याची यांची लायकी आहे का? कोणीही उठावं आणि बाळासाहेबांवर टीका करावी हे सहन करणार नाही” असं दीपक केसरकर म्हणाले.

निलेश राणेंच्या बोलण्याला कोणीही गांभीर्याने घेणार नाही. असं वक्तव्य करुन सनसनाटी निर्माण करायची आणि यातून आपल्याला काहीतरी मोठेपणा मिळेल हा त्यांचा उद्देश आहे. अशा माणसांना महाराष्ट्रातील जनता आपटेल, असा हल्लाबोल दीपक केसरकर यांनी केला.

निलेश राणे आणि दीपक केसरकर

निलेश राणे काय म्हणाले होते

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत कट रचून त्यांचा मृत्यू रुग्णालयात दाखवण्यात आला. तसंच याबाबत ज्या दोन शिवसैनिकांना माहिती होती, त्यांचाही बाळासाहेबांच्या सांगण्यावरुन खून करण्यात आला, असं स्फोटक वक्तव्य निलेश राणे यांनी केलं होतं. काही दिवसांपूर्वीच शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंच्या 10 वर्षांच्या कारकीर्दीत कोकणात 9 खून पडल्याचा आरोप केला होता. त्यावरुन निलेश राणे यांनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आरोप केले. इतकंच नाही तर बाळासाहेब ठाकरेंनी गायक सोनू निगमलाही ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही निलेश राणे यांनी केला होता.

वाचा:निलेश राणे यांचे आरोप त्यांच्याच शब्दात जसेच्या तसे 

आनंद दिघेंच्या पुतण्याची प्रतिक्रिया

दरम्यान, निलेश राणेंच्या या आरोपानंतर टीव्ही 9 मराठीने आनंद दिघेंचा पुतण्या केदार दिघे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.  “आनंद दिघेंच्या हत्येचा कट रचल्याचे आणि त्यांचा मृत्यू रुग्णालयात झाल्याचं भासवण्यात आलं ही वक्तव्य नेहमीच निवडणूक आली की राजकीय मंडळी करतात. निवडणूक संपली की हा विषय संपतो. बाळासाहेब आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे संबंध कसे होते हे ठाणेकर जनतेला माहीत आहे. जर निलेश राणे यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी जाहीर मांडावे. ज्या हेतूने या प्रकरणाची चौकशी होईल. मग जे सत्य असेल तर त्या बाजूने मी पुतण्या म्हणून उभा राहीन”

राज्यभरात निलेश राणेंविरोधात आंदोलन

निलेश राणेंच्या आरोपानंतर राज्यभरात शिवसैनिकांनी आंदोलनं केली. कुठे निलेश राणेंचा पुतळा जाळण्यात आला तर कुठे जोडो मारो आंदोलन करण्यात आलं होतं.

संबंधित बातम्या

कट रचून आनंद दिघेंचा मृत्यू दाखवला, बाळासाहेबांवर निलेश राणेंचा स्फोटक आरोप  

आनंद दिघेंचा कट रचून रुग्णालयात दाखवला मृत्यू : निलेश राणे 

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...