Anil Parab ED Raid : अनिल परब ईडीच्या जाळ्यात! 7 ठिकाणी छापेमारी, जाणून घ्या, 7 मोठ्या गोष्टी…

आणखी एका मंत्र्याच्या घरावर ईडीनं (ED) पहाटेपासून छापेमारीला सुरुवात केल्यानं महाराष्ट्राचं राजकारण (Maharashtra Politics) पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे.

Anil Parab ED Raid : अनिल परब ईडीच्या जाळ्यात! 7 ठिकाणी छापेमारी, जाणून घ्या, 7 मोठ्या गोष्टी...
अनिल परब अडचणीत?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 9:28 AM

अनिल परब यांच्या घरी ईडीने (Anil Parab ED raid) धाड टाकल्यानं एकच खळबळ उडाली. गुरुवारी सकाळीच ईडीकडून छापेमारी करण्यात आली. महाविकास आघाडीतील आणखी एका मंत्र्याच्या घरावर ईडीनं (ED) पहाटेपासून छापेमारीला सुरुवात केल्यानं महाराष्ट्राचं राजकारण (Maharashtra Politics) पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. महाराष्ट्रातील ही सगळ्यात मोठी घडामोड असून राज्याचं राजकारण आता पुन्हा तापायला सुरुवात झालीये. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर करण्यात आलेला नेमका आरोप काय आहे? ईडीने नेमकी कुठे कुठे कारवाई केली? जाणून घेऊयात सात सोप्या मुद्द्यांमधून…

पाहा व्हिडीओ :

  1. अनिल देशमुक आणि नवाब मलिकांनंतर आता मंत्री अनिल परब ईडीच्या रडारवर आलेत. गुरुवारी (26 मे, 2022) अनिल परब यांच्याविरोधात ईडीनं गुन्हा दाखल केला असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर त्यांच्याशी संबंधित मालमत्तांची चौकशी केला जातेय.
  2. अनिल परबांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या शिवालय बंगल्यावर ईडीचे अधिकारी दाखल झाले. यावेळी सीआरपीएफची तुकडीही शिवालय बंगल्यावर दाखल झाली. ईडीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली आहे. या छापेमारीच्या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्तही ठेवण्यात आलाय.
  3. हे सुद्धा वाचा
  4. नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यानंतर आता महाविकास आघाडीमधील आणखी मंत्री ईडीच्या रडारवर असल्याचं बोललं जातंय. अनिल परब यांच्यावर वेगवेगळ्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांचा तपास ईडीकडून केला जातोय.
  5. सचिन वाझे यांनी अनिल परबांच्या नावाचा उल्लेख करत त्यांच्यावर सनसनाटी आरोप केले होते. बीएमसीत कंत्राटं देण्यात कोट्यवधी रुपये लाटले गेले आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. तसंच दापोलीतील रिसॉर्टप्रकरणी किरीट सोमय्या यांनीहीह अनिल परबांवर निशाणा साधलेला होता. या दोन्ही प्रकरणांसह इतरही प्रकरणी अनिल परब यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
  6. एडीचे वरीष्ठ अधिकारी ताहसीन सुलतान हे शिवालय या अनिल परब यांच्या बंगल्यावरील छापेमारीत दिसून आले होते. त्यांच्याकडूनच अनिल परब यांची चौकशी केली जाणार असल्याची शक्यता आहे.
  7. मुंबईतील शासकीय निवासस्थान, मुंबईच्या वांद्रेतील खासगी निवासस्थान, तसंच दापोली रिसॉर्ट, परबांचे निकटवर्तीय बजरंग खरमाटेंच्या निवासस्थानी छापेमारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
  8. परिवहन मंत्री असलेल्या अनिल परबांच्या सीएच्या घरीही छापेमारी केली गेल्याचं सांगितलं जातंय. दापोलीमधील रिसॉर्टसह मुंबई, पुणे, रत्नागिरीमधील एकूण 7 ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे.
Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.