Anil Parab | एसटीचं खासगीकरण करणार नाही, 6 महिन्यात एसटीचं चित्र बदलेलं : अनिल परब

| Updated on: Nov 11, 2020 | 6:28 PM

परिवहन मंत्री अनिल परब यांनी  आगामी काळात एसटीचं खासगीकरण करण्याचा कोणताही विचार नाही, अशी माहिती दिली. (Anil Parab said ST is not privatize in future) 

Anil Parab | एसटीचं खासगीकरण करणार नाही, 6 महिन्यात एसटीचं चित्र बदलेलं : अनिल परब
Follow us on

रत्नागिरी- परिवहन मंत्री अनिल परब यांनी  आगामी काळात एसटीचं खासगीकरण करण्याचा कोणताही विचार नाही, अशी माहिती दिली. एसटीचा संचित तोटा कोरोना काळात वाढला. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करुन एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी, डिझेल आणि इतर खर्चासाठी 1 हजार कोटींचं पॅकेज देण्यात आलं आहे, असं अनिल परब यांनी सांगितले. (Anil Parab said ST is not privatize in future)

एसटीच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्याचे प्रयत्न आहेत. कोरोनामुळे उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यामध्ये कोरोनामुळे अडचणी आल्या. एसटी आणि इतर क्षेत्रातील वाहनांच्या टायर रिमोल्ड करण्याचा आमचा प्रयत्न आहे. एसटी गाड्यांचं मालवाहतूक करण्याचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्र शासनाचा मालवाहतुकीचा व्यवसाय एसटीकडे वर्ग करण्यात येणार आहे. एसटी स्वत:च्या वाहनांची बांधणी करते.

एसटीचे डिझेलचे पंप जनतेसाठी खुले करण्यात येणार आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात 30 पंप सुरु करण्यात येतील, असंही अनिल परब यांनी सांगितले. आगामी सहा महिन्यात एसटीचं चित्र बदलेलं दिसेल. एसटीच्या गाड्या रिकाम्या धावतात. त्यामुळे एसटीला तोटा होतो. मात्र, बसेस रिकाम्या धावू नये म्हणून अ‌ॅक्शन प्लॅन करण्यात येत आहे. त्यामुळे एसटीचं खासगीकरण करण्याचा कोणताही आमचा विचार नाही, असं अनिल परब यांनी स्पष्ट केले.

रत्नागिरीतील एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. सुरुवातीला आत्महत्या केली असं म्हटलं गेले त्यानंतर हत्या केली गेली, असा आरोप करण्यात आला, असं अनिल परब म्हणाले.

बिहारवरुन भाजपवर टीकास्त्र

बिहार निवडणुकीच्या निकालावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला फटकारले होते. शिवसेना नेते परिवहन मंत्री अनिल परब यांनी फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे. बिहार निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालेल्या शिवसेनेवर काय बोलायचे? अशी टीका फडणवीस यांनी केली होती. त्यावर बोलताना भाजपची अशी कित्येक ठिकाणी त्यांची डिपॉझिट जप्त झाली आहेत, त्यांनी जर आत्मपरिक्षण केलं असेल तर आम्ही सुद्धा करू असा उपरोधिक टोला परब यांनी फडणवीस यांना लगवाला.

बिहारनंतर अब की बार महाराष्ट्र म्हणलं जातयं मात्र पाच वर्षानंतर निवडणूक होईस असं मिश्किल उत्तर अनिल परब यांनी दिलं. बिहारमधल्या एनडीएच्या यशानंतर शिवसेना नेत्यांनी भाजपवर निशाणा साधलाय. शिवसेना बिहारमध्ये प्रमुख पक्ष म्हणून लढलेली नाही.

एका जमान्यात भाजपचे सुद्धा दोन खासदार होता, यश अपयश, चढ उतार होत असतो. ज्या पक्षाचे दोन खासदार होते त्या पक्षाचा आज पंतप्रधान आहे, त्यामुळे मतांवरून मोजमाप होवू शकत नाही. एका जमान्यात महाराष्ट्रात भाजपची काय परिस्थिती होती हे माहित आहे ना? असे चिमटे शिवसेना नेते अनिल परब यांनी भाजपला काढले.

दरम्यान, हिवाळी अधिवेशन घ्यायला विरोधकांनी कोणताही विरोध केलेला नाही. हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली.

संबंधित बातम्या :

अर्णवने मराठी बाईचं कुंकू पुसलं, किरीट सोमय्यांचा मारेकऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न : अनिल परब

Headline | 7 PM | एसटी कर्मचाऱ्यांना पगारासह दिवाळी बोनस देणार : अनिल परब

(Anil Parab said ST is not privatize in future)