अर्णवने मराठी बाईचं कुंकू पुसलं, किरीट सोमय्यांचा मारेकऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न : अनिल परब

"किरीट सोमय्या हे अर्णव गोस्वामी यांना वाचवायला बघत आहेत", असं अनिल परब म्हणाले (Anil Parab on Kirit Somaiya allegations).

अर्णवने मराठी बाईचं कुंकू पुसलं, किरीट सोमय्यांचा मारेकऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न : अनिल परब
Follow us
| Updated on: Nov 11, 2020 | 5:59 PM

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जमीन गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांना शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं. “किरीट सोमय्या पत्रकार अर्णव गोस्वामी यांना वाचवण्याकरता मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप करत आहेत”, अशी भूमिका अनिल परब यांनी मांडली (Anil Parab on Kirit Somaiya allegations).

“किरीट सोमय्या हे अर्णव गोस्वामी यांना वाचवायला बघत आहेत. याचा अर्थ ते एखाद्या हत्याऱ्याला वाचवायचा प्रयत्न करत आहेत. एका मराठी बाईचं कुंकू ज्याने पुसलं, ज्यामुळे महिलेच्या पतीला आत्महत्या करावी लागली अशा माणसाला दिल्लीपासूनचे सर्व नेते वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत”, असा आरोप अनिल परब यांनी केला (Anil Parab on Kirit Somaiya allegations).

किरीट सोमय्यांनी काय आरोप केले?

अर्णव गोस्वामी अटक प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि वास्तू सजावटकार अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा नजिकच्या किल्ला कोर्लई इथे रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली, असा दावा किरिट सोमय्या यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी हा व्यवहार का लपवला? मुख्यमंत्र्यांनी रेवदंडाजवळ जमीन का घेतली? असे अजून किती व्यवहार झाले आहेत? असा सवाल किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. त्याचबरोबर ठाकरे आणि नाईक कुटुंबात झालेल्या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनिषा रविंद्र वायकर यांनी वास्तू सजावटकार अन्वय मधूकर नाईक, अक्षदा अन्वय नाईक आणि आज्ञा अन्वय नाईक यांच्याकडून रायगड जिल्ह्यातील रेवदंडा जवळच्या किल्ला कोर्लई परिसरात जमीन घेतली. या ठिकाणापासून २ किलोमीटर अंतरावर माझी सासरवाडी आहे. त्यामुळे मला त्या जागेचं महत्व आपल्याला माहिती असल्याचं किरिट सोमय्या म्हणाले.

21 मार्च 2014 रोजी ठाकरे परिवाराकडून नाईक कुटुंबियांना 2 कोटी 20 लाख रुपये याव्यवराहाबाबत देण्यात आहे. हा व्यवहार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी का सांगितला नाही? असे अजून किती व्यवहार झाले आहेत? रेवदंडा परिसरात ठाकरे कुटुंबियांनी जमीन घेण्याचं कारण काय? अजून किती जमिनी घेतल्या गेल्या आहेत? असे प्रश्न किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले आहेत.

या व्यवहारातील सातबारा हा संयुक्त आहे. नाईक परिवाराचं आपण समजू शकतो, पण ठाकरे आणि वायकर हे दोघांनी मिळून हा व्यवहार का केला? हे दोघे कसे एकत्र आहे? असे प्रश्न विचारतानाच या जमीन व्यवहाराची चौकशी व्हावी अशी मागणीही किरिट सोमय्या यांनी केली आहे. अर्णव गोस्वामी प्रकरण सध्या चर्चेत आहे. या प्रकरणात एवढी तत्परता दाखवण्यामागील कारण समोर यायला हवं, अशी मागणीही सोमय्या यांच्याकडून करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

किरीट सोमय्या पाणचट माणूस, कुणीही भागीदारी करु शकतो, कुठलीही चौकशी करा : रवींद्र वायकर

BREAKING | रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार!, किरिट सोमय्या यांचा दावा, अर्णव गोस्वामी प्रकरणात मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

Arnab Goswami | अर्णव गोस्वामींना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.