एपीएमसीतील मापाडी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून पगार नाही, 4 कोटी 24 लाखांची थकबाकी

| Updated on: Sep 10, 2020 | 12:48 AM

मुंबई एपीएमसीमध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या मापाडी कर्मचाऱ्यांना 3 महिन्यापासून पगार मिळालेला नाही.

एपीएमसीतील मापाडी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून पगार नाही, 4 कोटी 24 लाखांची थकबाकी
Follow us on

नवी मुंबई : मुंबई एपीएमसीमध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या (APMC Mapadi Workers) मापाडी कर्मचाऱ्यांना 3 महिन्यापासून पगार मिळालेला नाही. अत्यावश्यक सेवेसाठी मुंबई कृषी उपन्न बाजार समितीमध्ये कोरोना काळात दिवसरात्र काम करणाऱ्या मापाडी कामगारांना पगार न मिळाल्यामुळे आज (9 सप्टेंबर) आमदार शशिकांत शिंदे यांनी 357 कामगारांना सोबत घेऊन भाजीपाला घाऊक बाजाराच्या आवक गेटमधून कार्यालयापर्यंत मोर्चा काढला (APMC Mapadi Workers).

“बाजार समितीची वसुली 100 टक्के आणि मापाड्यांची वसुली 100 टक्के झाली पाहिजे. जे व्यापारी वसुली देणार नाहीत त्याचं लायसन रद्द करा”, असा अल्टीमेटम यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी भाजीपाला मार्केटच्या सहायक सचिव यांना दिला आहे. त्याचबरोबर आवक गेटच्या कर्मचारी व मार्केट निरीक्षकांची चांगलीच शाळा घेतली.

कोरोना काळात दिवसरात्र कांदा बटाटा, फळ मार्केट, भाजीपाला आवारात गेली अनेक वर्षांपासून तोलाईची कामे करणाऱ्या 357 मापाडी कर्मचाऱ्यांना 4 कोटी 24 लाख थकीत तोलाईची रक्कम अजून देण्यात आलेली नाही.

“कोरोनाकाळात मुंबई एपीएमसी बाजार आवारात मोठ्या प्रमाणात गाड्यांची आवक-जावक होत आहे. तरी सुद्धा दिवसरात्र काम करुन पण आम्हाला 3 महिन्यापासून पगार देण्यात आला नाही. यामुळे आमच्या परिवाराची आर्थिक स्थिती बिघडली आहे”, अशी प्रतिक्रिया काही मापाडी कामगार यांनी दिली आहे.

हळूहळू बाजार संपत चालला आहे. बाजार टीकवायचा असेल, तर बाजार आवारात येणाऱ्या गाड्यांची महसूल वसुली करा आणि चांगल्या पद्धतीने काम करा. यावेळी सेवा देणाऱ्या कामगारांना पगार वेळेवर द्या. या कामगारांसाठी वारंवार पत्र व्यवहार करुन सुद्धा या लोकांना आवक देण्यात आली नाही. 1 ऑक्टोबरपर्यंत 100 टक्के बाजार फी वसुली करुन या कामगारांना पगार द्या, नाही तर जे काही दोषी असतील त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया आमदार शशिकांत शिंदे यांनी यावेळी दिले (APMC Mapadi Workers).

मार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येक गाड्याची आवक जावक यांची नोंद ठेवणे ही प्रत्येक मार्केट निरीक्षकाची जबाबदारी असते. परंतु, ती नोंद ठेवली गेली नाही. यामुळे यात भ्रष्टाचार झाल्याचा दिसून येत आहे.

मार्केटमध्ये गाड्यांची मोठ्या प्रमाणावर आवक होऊनसुद्धा मापाडी कर्मचाऱ्यांचा 3 महिने पगार दिला गेला नाही आणि मार्केटचा महसूल देखील वसूल केला गेला नाही. मार्केट निरीक्षक आणि कर्मचारी यांनी यामध्ये भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप मापाडी कर्मचाऱ्यांनी केला आहे.

APMC Mapadi Workers

संबंधित बातम्या :

नवी मुंबई पोलीस दलातील 514 कर्मचार्‍यांच्या बदल्या

मोबाईल शोरुम फोडणारी टोळी गजाआड, नवी मुंबई पोलिसांकडून तिघांना अटक, 45 लाखांचा मुद्देमाल जप्त