लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे लडाखला, भारत-चीनमध्ये तणावाच्या पार्श्वभूमीवर दौरा

| Updated on: Jun 23, 2020 | 3:05 PM

चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षात जखमी झालेल्या भारतीय जवानांची लष्कर प्रमुख लेहमध्ये भेट घेतील. (Army Chief General Manoj Mukund Naravane Visits Ladakh)

लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे लडाखला, भारत-चीनमध्ये तणावाच्या पार्श्वभूमीवर दौरा
Follow us on

नवी दिल्ली : भारत-चीनमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे लडाख दौऱ्यावर आहेत. दोन दिवसीय लेह-लडाख दौऱ्यात लष्कर प्रमुख ग्राऊंड कमांडर अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन परिस्थितीची पाहणी करणार आहेत. (Army Chief General Manoj Mukund Naravane Visits Ladakh)

चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षात जखमी झालेल्या भारतीय जवानांची लष्कर प्रमुख लेहमध्ये भेट घेतील. भारत आणि चीनमध्ये लष्करी स्तरावर झालेल्या चर्चेचा आढावाही ते घेतील. 14 व्या कोअर सैन्य अधिकाऱ्यांसह सीमेवरील परिस्थितीबाबत जनरल मनोज मुकुंद नरवणे चर्चा करतील. नरवणे यांच्यासह उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी हे असतील.

लष्कर प्रमुख सैन्याच्या तयारीसह चीनसोबत प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलएसी) आणि पाकिस्तानसमवेत नियंत्रण रेषेवर (एलओसी) तैनात लष्कराची पाहणी करतील.

15 जून रोजी गलवानच्या खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात झालेल्या लष्करी संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले होते, तर काही सैनिक जखमी झाले. भारत आणि चीनमधील तणाव कमी करण्यासाठी लष्करी स्तरावर चर्चा होत आहे.

हेही वाचा : India China face off : गलवान संघर्षावर भेकड चिनी प्रवक्त्यांचा नवा दावा

पूर्व लडाखमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाच्या जवळपास एका आठवड्यानंतर चिनी सैन्याने आपला कमांडिंग अधिकारी ठार झाल्याचे कबूल केले. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही देशांमधील लष्करी स्तरावरील चर्चेदरम्यान चिनी सैन्याने सोमवारी ही बाब मान्य केली.

(Army Chief General Manoj Mukund Naravane Visits Ladakh)