AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गलवान आमचंच, भारताने रुळावर यावं, चीनची गुर्मी कायम

भारत-चीन सीमेवर भारतीय सैन्यावर हल्ला करुन वर चीनची गुरगुर सुरुच असल्याचं दिसत आहे (Chinese Spokesperson on Galwan Valley).

गलवान आमचंच, भारताने रुळावर यावं, चीनची गुर्मी कायम
| Updated on: Jun 17, 2020 | 2:27 PM
Share

बिजिंग : भारत-चीन सीमेवर भारतीय सैन्यावर हल्ला करुन वर चीनची गुरगुर सुरुच असल्याचं दिसत आहे (Chinese Spokesperson on Galwan Valley). चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते झाओ लिजैन यांनी गलवान आमचंच आहे, भारतानं सैन्याला शिस्तीत ठेवावं आणि भारतानं रुळावर यावं, अशी भूमिका घेतली आहे. तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) भारतानेच चिथावल्याचा कांगावाही यावेळी चीनने केला आहे.

भारत-चीन सीमेवरील तणावावर बोलताना चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजैन म्हणाले, “गलवान खोऱ्याचं अधिपत्य आणि सार्वभौमता नेहमीच चीनच्या अखत्यारीत राहिली आहे. भारतीय सैन्याने सीमेवरील संकेतांचं उल्लंघन केलं आहे. तसेच सैन्याच्या कमांडर स्तरावरील एकमताने ठरवलेल्या नियमांचंही उल्लंघन केलं आहे. भारताने त्यांच्या आघाडीवर असलेल्या सैन्यांच्या तुकड्यांना शिस्तीची समज द्यावी, शस्त्रसंधी उल्लंघन आणि चिथावणीखोर कृती करण्यापासून रोखावं, अशी आम्ही मागणी केली आहे.”

“भारताने संवाद आणि चर्चेच्या मार्गाने मतभेद सोडवण्याच्या योग्य मार्गावर यावं. आम्ही परराष्ट्र मंत्रालय आणि सैन्याच्या माध्यमातून चर्चा करत आहोत. या प्रकरणात काय चूक आणि काय बरोबर आहे हे खूप स्पष्ट आहे. ही घटना चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेत घडली आहे. याचा दोष चीनला देता येणार नाही. चीनच्यावतीने आम्हाला आणखी संघर्ष नको आहे,” असंही चीन प्रवक्ते झाओ यांनी सांगितलं.

दुसरीकडे भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, “भारतीय जवानांना गलवान खोऱ्यात आलेलं वीरमरण अत्यंत वेदनादायी आणि अस्वस्थ करणारं, सीमेवर तैनात असताना आपल्या जवानांनी धाडस आणि शौर्य दाखवत देशासाठी बलिदान दिलं. जवानांचं बलिदान देश कधीच विसरणार नाही.”

दरम्यान, चिनी सैन्यासोबत गलवान खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर भारतात संतापाची लाट उठली आहे. चिनी सैन्यांकडून झालेल्या भेकड हल्ल्यात भारताचे अनेक जवान जखमीही झाले. त्यामुळे शहीदांची संख्या वाढण्याची भीतीही आहे. दुसरीकडे या संघर्षात चीनचेही 43 सैनिक मृत किंवा जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. (LAC Face off Live Updates)

चीनच्या या भ्याड हल्ल्यानंतर राजधानी दिल्लीतील हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे. या बैठकीमध्ये CDS प्रमुख बिपीन रावत, तिन्ही दलाचे प्रमुख उपस्थित आहेत.

15 आणि 16 जूनच्या रात्री धुमश्चक्री

भारत-चीन यांच्यात झालेल्या (India-China Face Off  20 Javan Martyr) धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्कराने ही अधिकृत माहिती दिली. मंगळवारी (16 जून) दुपारी भारतीय सेनेचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाल्याची माहिती होती. तर, 17 जवान हे गंभीर जखमी झाले होते. मात्र, आता हे 17 जवान देखील शहीद झाले आहेत. त्यामुळे भारत-चीन संघर्षात आतापर्यंत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वृत्तसंस्था एएनआयनुसार, या संघर्षात चीनच्या जखमी आणि मृत्यू झालेल्या सैनिकांची संख्या 43 वर पोहोचली आहे.

गलवान खोरे क्षेत्र महत्त्वपूर्ण का आहे?

“गलवान खोरे क्षेत्र भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण हे खोरे पाकिस्तान, चीनचे शिनजियांग आणि भारताच्या लडाख सीमा रेषेभागात पसरले आहे. 1962 साली भारत-चीन युद्धात हे क्षेत्र केंद्रस्थानी होतं”, असं जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे माजी प्रोफेसर आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक एसडी मुनी यांनी ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

संबंधित बातम्या : 

India-China Face Off | चीनसोबतच्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद, चीनच्या जखमी आणि मृत जवानांचा आकडा 43 वर

Galwan Valley conflict | भारत-चीनमध्ये गलवान खोऱ्यांवरुन नेमका तणाव काय?

India-China Territory Dispute | भारत-चीन नेमका सीमा-वाद काय?

संबंधित व्हिडीओ :

Chinese Spokesperson on Galwan Valley

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.