राजीव गांधींबद्दल गोडबोलेंचं ‘ते’ वक्तव्य खरं : ओवेसी

| Updated on: Nov 05, 2019 | 3:54 PM

राजीव गांधींनी बाबरी मशिदीचे कुलूप उघडण्याचे आदेश दिले, हे माधव गोडबोलेंचं वक्तव्य खरं असल्याचं असदुद्दीन ओवेसी म्हणाले

राजीव गांधींबद्दल गोडबोलेंचं ते वक्तव्य खरं : ओवेसी
Follow us on

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी बाबरी मशिदीचे कुलूप उघडण्याचे आदेश दिले होते, असं तत्कालीन केंद्रीय गृह सचिव माधव गोडबोले यांनी केलेलं वक्तव्य खरं होतं, असं म्हणत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi on Rajiv Gandhi) यांनी गोडबोलेंना दुजोरा दिला आहे.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी बाबरी मशिदीचे कुलूप उघडण्याचे आदेश दिले होते, यामध्ये तथ्य आहे. तसंच राजीव गांधी यांनी अयोध्येमधून आपल्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली, असंही ओवेसी म्हणाले. बाबरी मशिदीचं कुलूप उघडलं, तेव्हा हाच पक्षच सत्तेत होता आणि वादग्रस्त भाग पाडला तेव्हाही काँग्रेसचे पी. व्ही. नरसिम्हा राव हे पंतप्रधान होते असं असदुद्दीन ओवेसी म्हणाले.

1992 मध्ये राजीव गांधी बाबरी मशिदीचं कुलूप उघडण्याच्या हद्दीपर्यंत गेले, पंतप्रधान म्हणून त्यांच्या काळात मंदिराच्या
पायाभरणीचा समारंभ पार पडला. म्हणूनच मी त्यांना चळवळीचा दुसरा कारसेवक म्हटलं आहे, असं माधव गोडबोले यांनी सांगितलं होतं.

राजीव गांधी यांच्याकडे सक्रियता दाखवून अयोध्येबाबत योग्य निर्णय घेण्याची संधी होती, कारण तेव्हा दोन्ही बाजूंनी राजकीय स्थिती मजबूत नव्हती. त्यामुळे तोडगा समाधानाने मान्य झाला असता असं माधव गोडबोले यांनी (Asaduddin Owaisi on Rajiv Gandhi) सांगितलं होतं.