AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही जर सच्चे ‘योगी’ असाल तर मी पाकिस्तानचा प्रशंसक आहे हे सिद्ध करुन दाखवा; ओवैसींचं योगींना आव्हान

मी योगी आदित्यनाथांना आव्हान देतो की ते जर खरे योगी असतील तर 24 तासाच्या आत त्यांनी मी पाकिस्तानचा प्रशंसक असल्याचं सिद्ध करुन दाखवावं, असं आव्हान असदुद्दीन ओवैसींनी योगींना दिलं आहे.

तुम्ही जर सच्चे 'योगी' असाल तर मी पाकिस्तानचा प्रशंसक आहे हे सिद्ध करुन दाखवा; ओवैसींचं योगींना आव्हान
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Oct 22, 2020 | 12:00 AM
Share

नवी दिल्ली :  एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि राहुल गांधी पाकिस्तानचे प्रशंसक आहेत, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली होती. त्यांच्या या टीकेनंतर ओवैसी चांगलेच भडकले आहेत. ‘तुम्ही जर सच्चे ‘योगी’ असाल तर मी पाकिस्तानचा प्रशंसक आहे हे सिद्ध करुन दाखवा’, असं आव्हान असदुद्दीन ओवैसींनी योगींना दिलं आहे.

“मी योगी आदित्यनाथांना आव्हान देतो की ते जर सच्चे योगी असतील तर 24 तासाच्या आत त्यांनी मी पाकिस्तानचा प्रशंसक असल्याचं सिद्ध करावं. त्यांच्या वक्तव्यावरुन त्यांची निराशा दिसून येते. त्यांना हे माहिती नाही का की मी पाकिस्तानात गेलो होतो आणि तिथे भारतीय लोकशाहीबद्दल भरभरून बोललो”, अशा शब्दात ओवैसींनी योगींना सुनावले.

ओवैवी काँग्रेस-आरजेडीवरदेखील तुटून पडले. “बिहार विधानसभा निवडणूक जिंकण्याइतपत काँग्रेस आणि आरजेडीची ताकद नाही. भाजपावर मात करण्यासाठी त्यांच्यात बौद्धिक प्रामाणिकपणा नाही ना आत्मविश्वास. दोन्ही पक्षांकडे निवडणूक जिंकण्यासाठी जे राजकीय चातुर्य लागतं किंवा रणनिती लागते, त्याचा अभाव आहे”, अशी सडकून टीका त्यांनी काँग्रेस-आरजेडीवर केली.

योगी आदित्यनाथ काय म्हणाले होते?

योगी आदित्यनाथ हे बिहारमधील जमुई विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार श्रेयसी सिंग यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेत बोलत होते. या दरम्यान ते म्हणाले, “पंतप्रधान मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे. देशातील तरुणांना माहित आहे. राहुल गांधी आणि ओवैसी हे पाकिस्तानधार्जिने आहेत तसंच ते पाकिस्तानचे प्रशंसक आहेत”.

ओवैसींचं योगींना उत्तर

“मी योगी आदित्यनाथांना आव्हान देतो ती ते जर खरे योगी असतील तर 24 तासाच्या आता त्यांनी मी पाकिस्तानचा प्रशंसक असल्याचं सिद्ध करावं. त्यांच्या वक्तव्यावरुन त्यांची निराशा दिसून येते. त्यांना हे माहिती नाही का की मी पाकिस्तानात गेलो होतो आणि तिथे भारतीय लोकशाहीबद्दल भरभरून बोललो”.

संबंधित बातम्या

मुलगी सुशिक्षित असो की अशिक्षित, तुम्ही बलात्कारच करणार का? योगींवर भुजबळ कडाडले

यूपीत जातीय दंगल घडवण्याचं षडयंत्र, हाथरसच्या घटनेवर योगींचं वक्तव्य

Follow Us
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...