‘भारताचे तुकडे पाडा, नरेंद्र मोदी हा…’, भारतीय पेटून उठतील असं वादग्रस्त वक्तव्य, कोण आहे हा अर्थशास्त्रज्ञ?
एका अर्थशास्त्रज्ञाने भारताबद्दल अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे भारतीय पेटून उठतील, चिडतील, खवळतील. या अर्थशास्त्रज्ञाने भारताचे तुकडे पाडण्याची भाषा केली आहे. भारतातून त्याच्या पोस्टवर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

भारताचा विस्तार, प्रगती डोळ्यांना खुपत असल्यामुळे अनेकदा परदेशातून भारतविरोधी वक्तव्य होत असतात. आता अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयानंतर भारतविरोधी वक्तव्यांच प्रमाण वाढलं आहे. ऑस्ट्रियाच्या एका कथित अर्थशास्त्रज्ञाने असच एक संतापजनक वक्तव्य केलं आहे. गुनथर फेलिंगर यांनी भारताविरोधात विषारी वक्तव्य करुन वाद निर्माण केला आहे. गुनथर फेलिंगर स्वत:ला स्वयंघोषित नाटो विस्तार समितीचा अध्यक्ष मानतो. गुनथरने सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर भारताचे तुकडे पाडण्याच वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्याने ‘एक्स इंडिया’ नावाचा एक नकाशा सादर केलाय. त्यात त्याने भारताच्या अनेक भागांना पाकिस्तान, बांग्लादेश आणि कथित खलिस्तानचा हिस्सा दाखवला आहे.
“मी भारताचे तुकडे करण्याचं आवाहन करतो. नरेंद्र मोदी रशियाचा माणूस आहे. आपल्याला खलिस्तानच्या स्वातंत्र्याचं समर्थन करण्याची गरज आहे” असं गुनथरने आपल्या पोस्टमध्ये लिहिलय. गुनथर फेलिंगर याच्या या पोस्टनंतर भारतात संतापाची लाट उसळली आहे. सर्वसामान्यांपासून ते जाणकार अशा प्रकारची पोस्ट, विचारांना भारताच्या संप्रभुतेला धोका मानत आहेत.
‘हा काय वेडेपणा आहे?’
परराष्ट्र मंत्रालयाने तात्काळ ऑस्ट्रियाई दूतावासासमक्ष हा मुद्दा उपस्थित करावा, असं लोकांच म्हणणं आहे. राज्यसभा खासदार आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, “हा काय वेडेपणा आहे? MEA India ने तात्काळ ऑस्ट्रियाई दूतावासासमक्ष हा मुद्दा उपस्थित केला पाहिजे”
फेलिंगरची जुनी पोस्ट व्हायरल
गुनथर फेलिंगर यांची 2023 सालची एक पोस्ट सुद्धा सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतेय. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांचं भारताचे पुढचे पंतप्रधान म्हणून त्यांनी समर्थन केलं होतं. त्यांनी नरेंद्र मोदींना रशिया आणि चीनच समर्थक म्हटलं होतं.
काहीजणांना प्रचंड आक्षेप
सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या 50 टक्के टॅरिफचा मुद्दा गाजतोय. अमेरिका युरोपसह अनेक देश रशियाचे कडवे विरोधक आहेत. पण भारताची रशियासोबत घट्ट मैत्री आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी अशी अमेरिकेसह युरोपची इच्छा आहे. पण भारताने आपल्या तटस्थेच्या धोरणानुसार रशियाकडून तेल खरेदी सुरु ठेवलीय. त्यामुळे काहीजणांना प्रचंड आक्षेप आहे. त्यातूनच भारत तोडण्याची भाषा होत आहे.
