पाच घुमट आणि 161 फूट उंचीचा प्रस्ताव, अयोध्येच्या भव्य राम मंदिराच्या भूमीपूजनाचं पंतप्रधानांना निमंत्रण

अयोध्या राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची आज (18 जुलै) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली (Ayodhya Ram janmabhoomi trust). या बैठकीत ट्रस्टचे 12 सदस्य सहभागी झाले.

पाच घुमट आणि 161 फूट उंचीचा प्रस्ताव, अयोध्येच्या भव्य राम मंदिराच्या भूमीपूजनाचं पंतप्रधानांना निमंत्रण

लखनऊ : अयोध्या राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची आज (18 जुलै) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली (Ayodhya Ram janmabhoomi trust). या बैठकीत ट्रस्टचे 12 सदस्य सहभागी झाले. यापैकी 3 सदस्य हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाले. या बैठकीत भव्य राम मंदिर बांधण्याबाबत चर्चा झाली. याशिवाय भूमीपूजनच्या तारखेबाबतही चर्चा झाली (Ayodhya Ram janmabhoomi trust).

राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या बैठकीत आज सर्वातआधी मंदिराचं बांधकाम लवकरात लवकर सुरु करण्याबाबत चर्चा झाली. याआधीच्या बैठकीत मंदिराचे तीन घुमट आणि 148 फूट उंची असावी, असा प्रस्ताव होता. मात्र, आजच्या बैठकीत मंदिराचे पाच घुमट आणि उंची 161 फुटांपर्यंत वाढवण्यात यावी, असा प्रस्ताव ठेवण्यात आला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

अयोध्येतील राम मंदिर बांधकामाच्या भूमीपूजनसाठी ट्रस्टकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी याबाबत माहिती दिली आहे. याशिवाय ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांनी पंतप्रधान मोदींना भूमीपूजनाबाबत निवेदन दिलं आहे.

भूमीपूजनासाठी पंतप्रधान कार्यालयाला 3 ऑगस्ट आणि 5 ऑगस्ट अशा दोन तारखा सूचवण्यात आल्या आहेत. आता याबाबत अंतिम निर्णय पंतप्रधान कार्यालयाकडून घेण्यात येईल, असं चंपत राय यांनी सांगितलं आहे.

“राम मंदिराचं बांधकाम प्रसिद्ध आर्किटेक्ट चंद्रकांत सोमपुरा करतील. त्यांनीच सोमनाथ मंदिराचं बांधकाम केलं आहे”, असं चंपक राय यांनी सांगितलं. दरम्यान, मंदिर बांधकामासाठी पैशांची कमतरता भासणार नाही. कारण मंदिराच्या बांधकामासाठी 10 कोटी कुटुंब दान करणार आहेत, असंदेखील राय म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 जुलै रोजी अयोध्येतील राम मंदिराचे भूमीपूजन करणार होते. मात्र, सीमेवर भारत-चीनमध्ये तणाव वाढला. चीनने भारताच्या सीमारेषेवर घुसखोरी केली आणि संघर्षात 20 भारतीय जवान शहीद झाले. या पार्श्वभूमीवर राम मंदिर ट्रस्टने भूमीपूजनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

अयोध्येतली माती 2 जून रोजीच दिल्लीला आणण्यात आली होती. भाजपचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे ही माती स्वाधीन केली होती.

श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट

फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राम मंदिराबाबत निवेदन दिलं. मोदी कॅबिनेटने राम मंदिर ट्रस्टला मंजुरी दिली. मंदिर उभारण्यासाठी जो ट्रस्ट स्थापन करण्यात आला, त्याला ‘श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ असं नाव देण्यात आलं आहे. त्याबाबत निवेदन देताना मोदी म्हणाले, “श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट अयोध्येत भव्य-दिव्य श्रीराम मंदिर निर्माण आणि संबंधित विषयांवर निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र असेल”

भारताच्या प्राणवायूत, आदर्शात सर्वत्र प्रभू श्रीराम आणि अयोध्येचं ऐतिहासिक महत्त्व आहे. भविष्यात भाविकांची संख्या आणि श्रद्धा पाहता, सरकारने निर्णय घेतला आहे, अयोध्या कायद्यानुसार अधिगृहित सर्व जमीन 67 एकर ज्यामध्ये आत आणि बाहेरील अंगणाचा समावेश आहे, ती श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राला सोपवण्यात येईल, असं मोदींनी सांगितलं होतं.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सरकारने जन्मभूमीत राम मंदिर उभारण्यासाठी योजना तयार केली आहे. श्री राम मंदिर जन्मभूमी तीर्थ क्षेत्र स्थापन करण्यात येईल. हा ट्रस्ट पूर्णपणे स्वतंत्र असेल. सुप्रीम कोर्टाचे निर्देश, अनेक चर्चांनंतर आम्ही अयोध्येत सुन्नी वक्फ बोर्डाला 5 एकर जमीन मंजूर केली आहे, असंही मोदींनी सांगितलं होतं.

Published On - 9:58 pm, Sat, 18 July 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI