कार पाण्यात पडताच चालकाने बाळाला बाहेर फेकलं, पण बाळ पाण्यातच पडलं

| Updated on: Oct 29, 2019 | 3:36 PM

गाडी पाण्यात पडताच कारचालकाने पुलावर उभ्या असलेल्या लोकांच्या दिशेने बाळाला फेकलं. परंतु घाईत नेम चुकला आणि बाळ नेमकं पाण्यातच पडलं.

कार पाण्यात पडताच चालकाने बाळाला बाहेर फेकलं, पण बाळ पाण्यातच पडलं
Follow us on

भोपाळ : रिक्षाला चुकवण्याच्या नादात कार नदीत पडून मध्य प्रदेशात मोठा अपघात झाला. पाण्यातील कारमधून कारचालकाने सहा महिन्यांच्या बाळाला जमिनीवर फेकलं, पण दुर्दैवाने नेम चुकला आणि बाळ पाण्यातच पडलं. परंतु बाळाला वाचवण्यात यश (Baby in Car falls in River) आलं आहे.

मध्य प्रदेशातील निवारी जिल्ह्यातील ओरछा भागामध्ये घडलेल्या अपघाताचा व्हिडीओ पाहून अक्षरशः अंगावर काटा उभा राहतो. अपघातातून सहा महिन्यांचा आरव, त्याची आई अनामिका आणि कुटुंबीय सुखरुप बचावले आहेत. ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय या घटनेतून येतो.

ओरछा भागातील सतार पुलावरुन एक रिक्षा भरधाव वेगाने जात होती. विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने रिक्षाला चुकवण्याच्या नादात तिला धडक दिली. यानंतर पुलावरील एका खांबाला आपटून कार थेट नदीत पडली.

कारमध्ये सहा महिन्यांच्या चिमुकल्यासह पाच जण प्रवास करत होते. गाडी पाण्यात पडताच कारचालकाने आधी बाळाची शोधाशोध केली. बाळ सापडताच त्याला उचलून घेत त्याने पुलावर उभ्या असलेल्या लोकांच्या दिशेने बाळाला फेकलं. परंतु घाईत नेम चुकला आणि बाळ नेमकं पाण्यातच (Baby in Car falls in River) पडलं.

बाळ पुन्हा नदीतच पडल्याचं पाहून पुलावर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने ताबडतोब पाण्यात उडी मारली आणि बाळाला पकडले. बाळाला फेकणाऱ्या कारचालकानेही बाळाच्या दिशेने झेपावत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने बाळ सुखरुप असून त्याला रुग्णालयात दाखल करुन देखरेख कण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशातील उरई भागात राहणारं अपघातग्रस्त कुटुंब देवदर्शनासाठी गेलं होतं, परत येत असताना ही दुर्घटना (Baby in Car falls in River) घडली.