कोरोनाचा फटका, ‘बालिका वधू’चा दिग्दर्शक विकतोय भाजीपाला!

| Updated on: Sep 28, 2020 | 6:50 PM

लॉकडाऊनमुळे मालिकांचे चित्रीकरण बंद असल्याने मूळ गावी, उत्तर प्रदेशमध्ये परतलेले रामवृक्ष गौड (Rambriksh Gaur) सध्या भाजी विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.  

कोरोनाचा फटका, ‘बालिका वधू’चा दिग्दर्शक विकतोय भाजीपाला!
Follow us on

मुंबई : कोरोना महामारीमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यातील अडचणी वाढल्या. अनेकांचे संसार अक्षरशः रस्त्यावर आले. मिळेल ते काम करून कुटुंबाची गुजराण करण्यासाठी सगळ्यांची धडपड सुरू आहे. मनोरंजन क्षेत्रालाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे काम बंद असल्याने ‘बालिका वधू’सारख्या (Balika Vadhu) प्रसिद्ध मालिकेचे दिग्दर्शन करणाऱ्या रामवृक्ष गौड (Rambriksh Gaur) यांच्यावर भाजीपाला विकण्याची वेळ आली आहे (Balika Vadhu Director Rambriksh Gaur is selling vegetables in Uttar Pradesh).

लॉकडाऊनमुळे मालिकांचे चित्रीकरण बंद असल्याने मूळ गावी, उत्तर प्रदेशमध्ये परतलेले रामवृक्ष गौड (Rambriksh Gaur) सध्या भाजी विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.

लॉकडाऊनमुळे गावीच अडकले

रामवृक्ष गौड यांनी ‘कुछ तो लोग कहेंगे’, ‘ज्‍योति’ और ‘सुजाता’ सारख्या 25 पेक्षा अध‍िक मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. उत्तर प्रदेशातील आझमगडचे मूळ रहिवासी असलेले रामवृक्ष मुलीच्या परीक्षेसाठी गावी आले होते. परंतु, लॉकडाऊन जाहीर झाल्याने ते तिथेच अडकून पडले. गेल्या सहा महिन्यात जवळचे सगळे पैसे संपले, मुंबईत येणे ही कठीण झाले होते. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी भाजी विकण्याचा निर्णय घेतला.

2002 साली कामाच्या शोधात ते मुंबईत आले होते. मित्राच्या मदतीने त्यांनी कामे मिळवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी मालिकांसाठी दिग्दर्शनाचे काम सांभाळले. त्यानंतर हळूहळू ते चित्रपट विश्वातदेखील चमकू लागले. यशपाल शर्मा, मिलिंद गुणाजी, राजपाल यादव, रणदीप हुडा, सुनील शेट्टी सारख्या मोठ्या कलाकारांसोबत त्यांनी काम केले आहे. (Balika Vadhu Director Rambriksh Gaur is selling vegetables in Uttar Pradesh)

वीजवितरण विभागात नोकरी

चित्रपट-मालिकांच्या क्षेत्रात येण्यापूर्वी रामवृक्ष वीजवितरण विभागात नोकरी करत होते. मनोरंजन क्षेत्रात काम करण्याची आवड निर्माण झाल्याने, त्यांनी नोकरी सोडून सहायक दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. जसा जसा अनुभव येत गेला, तशी कामे मिळत गेल्याचे ते सांगतात. सध्या जरी ते भाजी विकत असले, तरी त्यांनी जिद्द सोडलेली नाही. कोरोनाचा कहर कमी होताच, ते पुन्हा मुंबईत येऊन नव्या जोमाने कामास सुरुवात करणार आहेत.

कुटुंबाचा खंबीर पाठिंबा

रामवृक्ष यांची पत्नी या कठीण काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. घरची परिस्थिती हालाखीची झाली असली तर, हे ही दिवस जातील, असे म्हणत तिने पतीला मदत करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या मुलीनेही, आपण पुन्हा मुंबईत परतू आणि नव्याने सुरुवात करू, असे सांगत वडिलांचे मनोधैर्य वाढवले आहे.

(Balika Vadhu Director Rambriksh Gaur is selling vegetables in Uttar Pradesh)

 

संबंधित बातम्या : 

Ashalata Wabgaonkar | ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन, मालिकेच्या शुटींगदरम्यान लागण

Malaika Arora | अर्जुन कपूर पाठोपाठ मलायका अरोरालाही कोरोनाची लागण

अभिजीत केळकर, पौर्णिमा डे यांच्यासह ‘सिंगिंग स्टार’च्या सहा कलाकारांना कोरोनाची लागण