स्टेअरिंगवर हार्ट अटॅक, 40 प्रवाशांसह बस दवाखान्यात, बस थांबवून ड्रायव्हरने जीव सोडला!

| Updated on: Oct 08, 2019 | 11:41 AM

उत्तर प्रदेशच्या बांदा येथे एक धक्कादायक घटना घडली. बांदा ते लखनऊ जाणाऱ्या रोडवेज बसच्या चालकाला अचानक हृदयविकाराचा धक्का आला (Bus Driver got Heart Attack). हृदयविकाराचा धक्का आला त्याच्या सुरुवातीच्या काळात चालकाच्या छातीत दुखू लागलं होतं. विशेष म्हणजे इतक्या त्रासातही या चालकाने प्रवाशांनी भरलेली बस सुरक्षित ठिकाणी पोहोचवली

स्टेअरिंगवर हार्ट अटॅक, 40 प्रवाशांसह बस दवाखान्यात, बस थांबवून ड्रायव्हरने जीव सोडला!
Follow us on

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या बांदा येथे एक धक्कादायक घटना घडली. बांदा ते लखनऊ जाणाऱ्या रोडवेज बसच्या चालकाला अचानक हृदयविकाराचा धक्का आला (Bus Driver got Heart Attack). हृदयविकाराचा धक्का आला त्याच्या सुरुवातीच्या काळात चालकाच्या छातीत दुखू लागलं होतं. विशेष म्हणजे इतक्या त्रासातही या चालकाने प्रवाशांनी भरलेली बस सुरक्षित ठिकाणी पोहोचवली, मात्र त्यानंतर या चालकाचा मृत्यू झाला (Bus Driver got Heart Attack).

या बसमध्ये 40 पेक्षा जास्त प्रवासी होते. चालकाला छातीत दुखू लागल्याने तो बस हळू चालवू लागला. तेव्हा वाहकाने त्याला विचारलं की इतक्या धीम्या गतीने गाडी चालवतो आहेस. तेव्हा त्याने त्याच्या छातीत दुखत असल्याचं सांगितलं. त्यानंतर वाहकाने चालकाला बस परत बांदा किंवा तिंदवारीपर्यंत घेऊन जाण्यास सांगितलं (Banda to Lucknow roadways bus).

त्रासातही प्रवाशांना सुखरुप पोहोचवलं

बसच्या चालकाने असहनीय त्रासातही बसला व्यवस्थितपणे चालवत तिंदवारी आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचवलं. मात्र, येथे उपचारादरम्यान या चालकाचा मृत्यू झाला.

या प्रकरणी रोडवेजचे सर्व अधिकारी प्रसारमाध्यमांसमोर येण्यापासून वाचताना दिसले. या चालकाची आरोग्य तपासणी वेळेवर का नाही झाली हा प्रश्न आता विचारला जात आहे. बस (UP 90 T 5518) सोमवारी सकाळी साडे पाच वाजता लखनऊसाठी रवाना झाली होती.

मृत्यू झालेल्या चालकाचं नाव राजाबाबू आहे, ते 40 वर्षांचे होते. राजाबाबू पैलानी ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नरी गावात राहायचे. 2014 मध्ये रोडवेज कराराअंतर्गत ते बस चालक म्हणून रुजू झाले होते.

कुटुंबाला मदत मिळणार

राजाबाबू यांच्या कुटुंबात पत्नी शांती आणि चार मुलं आहेत. करारानुसार, मृतक चालकाच्या कुटुंबाला मदत मिळेल अशी माहिती, रोडवेजचे सहाय्यक प्रादेशिक व्यवस्थापक परमानंद यांनी दिली.