बारामतीकरांना धास्ती, रिक्षा चालकानंतर भाजी विक्रेत्याला कोरोनाची लागण

| Updated on: Apr 07, 2020 | 12:51 PM

बारामतीत गेल्या आठवड्यात एका रिक्षा चालकाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता शहरातील भाजी विक्रेत्याला कोरोनाची लागण झाली (Baramati Vegetable Vendor Corona Positive) आहे.

बारामतीकरांना धास्ती, रिक्षा चालकानंतर भाजी विक्रेत्याला कोरोनाची लागण
Follow us on

बारामती : राज्यात कोरोनाचा गुणाकार होण्यास सुरुवात झाली (Baramati Vegetable Vendor Corona Positive)  आहे. राज्यात 868 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. बारामतीत गेल्या आठवड्यात एका रिक्षा चालकाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता शहरातील भाजी विक्रेत्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्याच्या आजूबाजूचा 5 किमीपर्यंतचा परिसर सील करण्यात आला आहे.

बारामती शहरातील समर्थनगर भागातील एका भाजी विक्रेत्याला कोरोनाची (Baramati Vegetable Vendor Corona Positive) लागण झाल्याचं तपासणीनंतर समोर आलं होतं. त्यामुळे या भागातील 5 किमीपर्यंतचा परिसर हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर प्रातांधिकारी दादासाहेब कांबळे यांनी नागरिकांनी दक्षता घेण्याबरोबरच घरातून बाहेर पडू नये असं आवाहन केलं आहे.

दरम्यान या आधी बारामतीत एका रिक्षा चालकाला कोरोनाची लागण झाली होती. मात्र या आधीच्या रुग्णाशी संबंधित व्यक्तींच्या टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर बारामतीकरांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र त्यानंतर लगेचच दुसरा रुग्ण आढळल्यामुळे पुन्हा एकदा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हा संबंधित रुग्ण भाजी विक्रेता असल्यानं त्याच्या संपर्कात अनेकजण आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं त्याबद्दल चौकशी सुरु केली आहे. तसेच या परिसरात सर्वेक्षणालाही सुरुवात केली (Baramati Vegetable Vendor Corona Positive) आहे.