साहेब…मी अजून जिवंत! प्रशासकीय कार्यालयात जिवंत शेतकऱ्याची मृत म्हणून नोंद

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळावा म्हणून एका शेतकऱ्याने अर्ज दाखल (beed farmer Reported dead in government office)  केला.

साहेब...मी अजून जिवंत! प्रशासकीय कार्यालयात जिवंत शेतकऱ्याची मृत म्हणून नोंद
Follow us
| Updated on: Feb 04, 2020 | 10:45 PM

बीड : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळावा म्हणून एका शेतकऱ्याने अर्ज दाखल (beed farmer Reported dead in government office)  केला. मात्र प्रशासनातील अधिकाऱ्यांनी चक्क त्या शेतकऱ्याची प्रशासकीय कार्यालयात मृत म्हणून नोंद केली. हा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातील धारुर तहसील कार्यालयात घडली. त्यावेळी पीडित शेतकऱ्यावर साहेब…अजून मी जिवंत आहे…अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

या प्रकाराने शेतकऱ्यासह त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. धारुर तहसील प्रशासनाच्या या अजब कारभाराची जिल्ह्यातचं नव्हे तर राज्यभरात निंदा केली जात आहे. तसेच याप्रकरणाचा संतापही व्यक्त केला जात आहे.

बीड जिल्ह्यातील धारूर शहरातील अनिल मिश्रा या शेतकऱ्याने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळावा, यासाठी त्यांनी धारूर तहसिल कार्यालयात 4 डिसेंबर 2019 मध्ये अर्ज दाखल केला होता. त्यानंतर महिनाभरानंतर आपल्या अर्जाची चौकशी करण्यासाठी अनिल मिश्रा तहसीलमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांच्यासमोर एक धक्कादायक बाब त्यांच्यासमोर आली. अनिल हे जिवंत असूनही त्यांची मृत म्हणून नोंद करण्यात आली. हे पाहून त्या वृद्ध शेतकऱ्यांना धक्काच बसला. आपण जिवंत असताना प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे हा प्रकार घडल्याने त्यांचे मनोधैर्य खचले (beed farmer Reported dead in government office)  आहे.

दरम्यान याप्रकरणी तात्काळ मुख्यमंत्री, महसूलमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच धारूर पोलिसाकडे तक्रार करून या गंभीर प्रकारची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

वृद्ध शेतकरी अनिल मिश्रा यांच्या सतर्कतेमुळे हा गंभीर प्रकार समोर आला आहे. यामुळे धारूर तहसील प्रशासनाचा कारभार कसा चालतो हे उघड झाले आहे. तसेच तहसील कार्यालयाच्या कामकाजच्या पद्धतीवर प्रश्न चिन्हं निर्माण झालं आहे. त्याशिवाय प्रशासनाच्या या कृत्यावर संताप व्यक्त केला आहे. तसेच दोषींवर कारवाई करावी अशी मागणी पीडित शेतकरी आणि त्यांचा कुटुंबियांनी केली आहे.

तहसील प्रशासनाकडून ही चूक झाल्याचं समोर येत असलं. तरी याची शहानिशा करण्यासाठी आमचे प्रतिनिधी तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर या ठिकाणी इंग्रजीची अनभिज्ञता पाहायला मिळाली. हा प्रकार टेक्निकल नसून पात्र-आपत्रतेचा आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याला याचं काहीच कळलं नाही. त्यामुळे मृत्यूबाबत कांगावा झाल्याचा स्पष्टीकरण तहसील प्रशासनाकडून देण्यात (beed farmer Reported dead in government office)  आलं.

Non Stop LIVE Update
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.