दुकानाचं शटर बंद करुन प्रेयसीचा गळा चिरला, हत्येनंतर प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न

भाईंदरमध्ये 28 वर्षीय आरोपीने दुकानात प्रेयसीची गळा चिरुन हत्या केल्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला.

दुकानाचं शटर बंद करुन प्रेयसीचा गळा चिरला, हत्येनंतर प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न
| Updated on: Oct 23, 2019 | 8:00 AM

मीरा भाईंदर : प्रेम प्रकरणातून प्रेयसीची हत्या केल्यानंतर प्रियकराने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना भाईंदर परिसरात उघडकीस आली आहे. 28 वर्षीय आरोपीने 22 वर्षीय तरुणीची दुकानात गळा चिरुन हत्या (Bhayandar  Man kills Girlfriend) केली.

भाईंदर पूर्व भागातील तलाव रोड जवळ बाळकृष्ण लीला बिल्डिंगमधील दुकानात हा प्रकार घडला. महालक्ष्मी डेअरी या आपल्या भावाच्या दुकानावर आरोपी कुंदन आचार्य दुपारच्या सुमारास बसला होता. त्यावेळी त्याची प्रेयसी अंकिता रावल भाजी खरेदी करण्यासाठी खाली आली होती.

कुंदनने तिला दुकानात बोलावलं आणि शटर बंद केलं. दोघांमध्ये काही कारणावरुन बाचाबाची झाली. त्यानंतर कुंदनने चाकू काढून अंकिताच्या गळ्यावर सपासप वार केले. यामध्ये अंकिताचा जागीच मृत्यू झाला.

जावयासोबत लिव्ह इनमध्ये, वादावादीतून सासूची हत्या

अंकिताच्या हत्येनंतर त्याने स्वतःचा गळा आणि मानेवर वार करुन आत्महत्या करण्याच प्रयत्न केला (Bhayandar Man kills Girlfriend). मात्र वेदना असह्य झाल्यामुळे तो दुकानाचं शटर उघडून बाहेर पडला, तेव्हा तो रक्ताच्या थारोळ्यात होता. आजूबाजूच्या लोकांनी त्याला रुग्णवाहिकेने मीरारोडमधील लाईफ लाईन रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं. कुंदनवर उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर आहे.

कुंदन आचार्य आणि अंकिता रावल या दोघांचे प्रेमसंबंध असल्याचं म्हटलं जातं. या प्रेमप्रकरणामुळेच दोघांमध्ये काही वाद झाला आणि त्यातून कुंदनने अंकिताची हत्या केल्याचा आरोप केला जात आहे. कुंदन आचार्यवर पोलिसांनी अंकिता रावलच्या हत्येचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरु केला आहे.