AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 13 : मधुरिमाने विशालला चप्पल मारली, विशालची थेट बिग बॉसला धमकी

दोघांमध्ये बॉटम 2 वरुन वाद सुरु झाला. दोघेही एकमेकांसाठी अपशब्द वापरु लागले. हा वाद इतका विकोपाला गेला की, मधुरिमाने एक्स बॉयफ्रेंड विशालला चक्क चपलेने झोडपून काढलं.

Bigg Boss 13 : मधुरिमाने विशालला चप्पल मारली, विशालची थेट बिग बॉसला धमकी
| Updated on: Jan 07, 2020 | 3:54 PM
Share

मुंबई : ‘बिग बॉस 13’चा प्रवास हा आता अंतिम टप्प्याकडे वळला आहे (Bigg Boss 13). त्यामुळे सर्व स्पर्धक आता प्रेक्षकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ते कुठल्याही थराला जायला तयार आहेत. गेल्या भागात मधुरिमा तुली आणि विशाल आदित्य यांच्यामध्ये एक मोठं भांडण झालं. दोघांमध्ये बॉटम 2 वरुन वाद सुरु झाला. दोघेही एकमेकांसाठी अपशब्द वापरु लागले. हा वाद इतका विकोपाला गेला की, मधुरिमाने एक्स बॉयफ्रेंड विशालला चक्क चपलेने झोडपून काढलं. त्यानंतर विशाल संतापला आणि बिग बॉसला कन्फेशन रुममध्ये बोलवण्याची जिद्द करु लागला (Madhurima Tuli And Vishal Fight).

बिग बॉस त्याला काही वेळपर्यंत कन्फेशन रुममध्ये बोलवत नाही. त्यानंतर विशाल रागाच्या भरात जोराजोरात कन्फेशन रुमचं दार ठोठावू लागतो. अखेर बिग बॉस त्याला आणि मधुरिमाला कन्फेशन रुममध्ये बोलवतात, तेव्हा विशाल थेट बिग बॉसलाच धमकी देतो. विशाल बिग बॉसला म्हणतो की, तो मधुरिमासोबत एका घरात नाही राहू शकत. एकतर ती घरात राहील किंवा तो.

बिग बॉस या दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न करतात. बिग बॉस त्यांना सांगतात, ही तुमच्या दोघांमधील वयैक्तिक बाब आहे, तुम्ही दोघे एकमेकांशी बोलून ही समस्या सोडवून घ्या. मात्र, विशाल काही एक ऐकायला तयार नसतो. तो बिग बॉसला यावर तोडगा काढण्यास सांगतो. या दरम्यान, मधुरिमा विशालची माफी देखील मागते, मात्र विशाल तिला माफ करण्यास तयार होत नाही.

यानंतर बिग बॉस मधुरिमाला शिक्षा म्हणून 2 आठवड्यांसाठी थेट नॉमिनेट करतात. मात्र, यानंतरही विशालचं समाधान होत नाही. मधुरिमासोबत एका घरात राहणार नाही, यावर तो अडून बसतो. अखेर बिग बॉस संतापून याचा निर्णय त्यांच्यावर सोडून देतात. बिग बॉस त्यांना सांगतात की, हे तुम्ही ठरवा तुम्हाला एका घरात राहायचं आहे की नाही आणि जर तुम्ही एका घरात राहू शकत नसाल, तर कोण या घरातून जाईल याचाही निर्यण घ्या. बिग बॉस त्यांचा निर्णय मान्य करतील.

आता मधुरिमा घराबाहेर जाणार की विशाल, विशालचा राग शांत होणार की नाही, हे दोघे बिग बॉसने दिलेल्या पर्यायांचा विचार करणार की नाही, की बिग बॉसच्या घरात आणखी कुठला ड्रामा पाहायला मिळेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं तर आजचा भाग प्रदर्शित झाल्यानंतरच मिळू शकतील. मात्र, बिग बॉसच्या घरात नेहमीप्रमाणे आजही काहीतरी इंटरेस्टिंग पाहायला मिळणार हे नक्की.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...