नितीश कुमारांच्या पहिल्या मंत्र्याचा तीन दिवसात राजीनामा, घोटाळ्याच्या आरोपाने खळबळ

सातत्याने भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन टीकेचे धनी ठरलेल्या बिहारच्या शिक्षण मंत्र्यांनी अखेर आज (19 नोव्हेंबर) राजीनामा दिला.

नितीश कुमारांच्या पहिल्या मंत्र्याचा तीन दिवसात राजीनामा, घोटाळ्याच्या आरोपाने खळबळ


पाटणा : सातत्याने भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन टीकेचे धनी ठरलेल्या बिहारच्या शिक्षण मंत्र्यांनी अखेर आज (19 नोव्हेंबर) राजीनामा दिला. नितीश कुमार यांच्या कॅबिनेटमध्ये (Nitish Cabinet) शिक्षण मंत्री म्हणून नियुक्ती झालेल्या मेवालाल चौधरी (Mewalal Chaudhry) यांच्यावर सहाय्यक प्राध्यपक भरतीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप होता. यावरुन प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख तेजस्वी यादव यांनी जोरदार टीका केली. तसेच नितीश कुमार आणि भाजपवर भ्रष्टाचाऱ्यांना मंत्री केल्याचा आरोप केला. यानंतर चौधरी यांनी राजीनामा दिला आहे (Bihar Education Minister Mewalal Chaudhary resigns after corruption allegations).

मेवालाल चौधरी यांनी बुधवारी (18 नोव्हेंबर) नितीश कुमार यांची मुख्यमंत्री निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. तेव्हापासूनच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. आता चौधरी यांचा राजीनामा बिहारच्या राज्यपालांना मिळाला आहे. मेवालाल यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे विरोधीपक्षांनी नितीश कुमार यांना धारेवर धरल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जातंय. विशेष म्हणजे मेवालाल चौधरी यांनी मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर राजदचे नेते आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव (Tejashwi) यांच्यावर 50 कोटींचा मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचंही सांगितलंय.

मेवालाल चौधरी म्हणाले, “कोणत्याही प्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यावर किंवा न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरच संबंधित आरोपी दोषी सिद्ध होतो. माझ्याविरोधात ना कोणतं आरोपपत्र दाखल आहे, ना निकाल देऊन दोषी ठरवलं आहे.” यावेळी मेवालाल यांनी आपल्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले आहे. तसेच तेजस्वी यादव यांनी बदनामी केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचं म्हटलं.

भ्रष्टाचाराच्या आरोपांनी बिहारच्या राजकारणाचा पारा चढला असतानाच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मेवालाल चौधरी यांना मुख्यमंत्री निवासस्थानी बोलावून घेतलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीतच मोठा निर्णय घेण्याबाबत निश्चित झालं. विरोधकांनी सहाय्यक प्राध्यापकांच्या नियुक्तीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत हल्लाबोल केल्यानंतर मेवालाल यांनी राजीनामा दिलाय. मेवालाल चौधरी तारापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. नितीश कुमार सरकारमध्ये ते पहिल्यांदा मंत्री झाले आहेत.

मेवालाल बिहार अॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये कुलगुरु असताना त्यांच्यावर प्राध्यापक नियुक्तीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी त्यांच्याविरोधा एफआयआर देखील दाखल झाली होती. तसेच त्यांच्या पक्षाने देखील त्यांची हकालपट्टी केली होती. मेवालाल चौधरी यांना मंत्री केल्यानंतर तेजस्वी यादव यांनी ट्विट करत म्हटलं होतं, “भ्रष्टाचाराच्या गंभीर प्रकरणात आरोपी मेवालाल चौधरी यांना शिक्षण मंत्री करुन नितीश कुमार यांनी त्यांना भ्रष्टाचाराचं बक्षिस आणि खुलेपणाने लूट करण्याची सवलत दिली आहे का?”

संबंधित बातम्या :

बिहारमध्ये प्राध्यापक नियुक्तीत भ्रष्टाचाराचा आरोप असणारा शिक्षक शिक्षणमंत्री, विरोधकांकडून जोरदार टीका

बिहारचे अर्थमंत्री तारकिशोर प्रसाद करोडपती, त्यांची LIC आणि सोन्यातही गुंतवणूक

व्हिडीओ पाहा :

Bihar Education Minister Mewalal Chaudhary resigns after corruption allegations

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI