AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकीय पर्यटकांच्या बोलण्याला शेतकऱ्यांनी भुलू नये, राहुल गांधींच्या परदेश दौर्‍यावरुन भाजपचा टोला

राहुल गांधी हे रविवारी इटलीला रवाना झाले होते. त्यानंतर विरोधकांकडून राहुल गांधी नेहमीप्रमाणे मौजमजेसाठी परदेशात गेल्याची टीका केली जाऊ लागली आहे.

राजकीय पर्यटकांच्या बोलण्याला शेतकऱ्यांनी भुलू नये, राहुल गांधींच्या परदेश दौर्‍यावरुन भाजपचा टोला
Rahul Gandhi
| Updated on: Dec 28, 2020 | 3:31 PM
Share

नवी दिल्ली : देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसचा आज 136 वा स्थापना दिन आहे. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष तसेच खासदार राहुल गांधी स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला हजर राहू शकले नाहीत. राहुल गांधी पक्षाच्या स्थापना दिनाच्या अगोदर खासगी कारणांसाठी परदेश दौर्‍यावर गेले आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलन (Farmers protest) ऐन भरात असताना परदेशात गेल्यामुळे राहुल गांधी (Rahul Gandhi) हे सध्या टीकेचे धनी होत आहेत. भारतीय जनता पक्ष यावरुन राहुल गांधींना घेरण्याचा प्रयत्न करत आहे. तर काँग्रेस नेत्यांना राहुल गांधींच्या बचावासाठी पुढे यावे लागत आहे. (bjp attacks on Rahul gandhi over foreign trip between farmers protest and congress foundation day)

राहुल गांधी हे रविवारी इटलीला रवाना झाले होते. त्यानंतर विरोधकांकडून राहुल गांधी नेहमीप्रमाणे मौजमजेसाठी परदेशात गेल्याची टीका करण्यात आली. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी राहुल गांधी वैयक्तिक कारणासाठी इटलीला जात आहेत, एवढीच माहिती दिली होती. त्यामुळे शेतकरी आंदोलन निर्णायक टप्प्यावर असताना राहुल गांधी यांच्या परदेशवारीवर टीका सुरु झाली होती.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, त्यात त्यांनी म्हटलंय की, काँग्रेस इथे 136 वा स्थापना दिन साजरा करतेय आणि राहुल गांधी मात्र पळून गेले आहेत. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, काँग्रेसलाही माहीत आहे की, राहुल गांधी राजकारणाप्रती फार गंभीर नाहीत. ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींविरूद्ध अपशब्द वापरू शकतात, जे की ते सतत करत असतात.

भाजप नेते डी. के. अरुणा म्हणाले की, राहुल एक राजकीय पर्यटक आहेत. काँग्रेसचे 90 टक्के नेते राहुल यांचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु काँग्रेसवाले जनतेचा विचार कधी करणार? देशातील शेतकऱ्यांनी राहुल यांच्या नादी लागू नये.

काँग्रेसकडून बचाव

काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल म्हणाले की, राहुल गांधी त्यांच्या आजीला (सोनिया गांधी यांच्या आई) भेटायला गेले आहेत. यात चुकीचं काय आहे? सर्वांना खासगी कारणासाठी कुठेही जाण्याची परवानगी आहे. भाजप सध्या दुटप्पी राजकारण करत आहे. ते केवळ आणि केवळ राहुल गांधी यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत.

राहुल गांधी वादाच्या भोवऱ्यात का सापडले?

यापूर्वी संसदेत कृषी विधेयक मांडण्यात आले तेव्हादेखील राहुल गांधी आणि सोनिया गांधी परदेशात गेले होते. त्यावेळी सोनिया गांधी यांच्या प्रकृतीच्या कारणासाठी राहुल गांधी यांना परदेशात जावे लागले असले तरी निर्णायक क्षणी त्यांचे संसदेत उपस्थित नसणे अनेकांच्या डोळ्यात खुपले होते.

त्यानंतर आता दिल्लीतील शेतकरी आंदोलन निर्णायक टप्प्यावर पोहोचले असताना परदेशवारी करून राहुल गांधी यांनी विरोधकांच्या हाती आयते कोलीत दिले होते. मात्र, विरोधकांकडून या मुद्दयाचे भांडवल केले जाऊ शकते हे समजल्यानंतर आता काँग्रेसकडून राहुल गांधी यांच्या परदेशवारीचे कारण स्पष्ट करण्यात आले आहे.

शेतकरी नेत्याकडूनही राहुल गांधींवर टीका

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी राहुल यांना लक्ष्य केले होते. राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी आले नाहीत. त्यांनी आमच्याशी संवादही साधला नाही. ते सर्वकाही हवेत करत आहेत. अशावेळी विरोधी पक्षाने मजबूत असायला हवे. पण विरोधी पक्ष प्रचंड कमकुवत असल्याचे टिकैत यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

‘…म्हणून कृषी विधेयकांवरील चर्चेवेळी मी संसदेत उपस्थित नव्हतो’

शेतकरी आंदोलन भरात असताना राहुल गांधी इटलीला का गेले? वाचा काँग्रेस काय म्हणतेय?

(bjp attacks on Rahul gandhi over foreign trip between farmers protest and congress foundation day)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.