AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपचा ग्रामपंचायत निवडणुकांना विरोध, निवडणुका पुढे ढकला बावनकुळेंची मागणी

गावांमध्ये कोरोनाचे संकट वाढत असल्याने ग्रामपंचायत निवडणुका सहा महिने पुढे ढकलाव्या, अशी मागणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीय. Chandrashekhar Bawankule demands postpone Grampanchayat elections

भाजपचा ग्रामपंचायत निवडणुकांना विरोध, निवडणुका पुढे ढकला बावनकुळेंची मागणी
| Edited By: | Updated on: Jan 15, 2021 | 7:58 PM
Share

नागपूर- राज्यातील 19 जिल्ह्यात 1566 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची चाचपणी राज्य निवडणूक आयोगाने सुरु केलीय. ‘भाजप या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तयार आहे. पण, गावांमध्ये कोरोनाचे संकट वाढत असल्याने ग्रामपंचायत निवडणुका सहा महिने पुढे ढकलाव्या’ अशी मागणी भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे.(Chandrashekhar Bawankule demands postpone Grampanchayat elections)

कोरोनाचे संक्रमण ग्रामीण भागात वाढत आहे, त्यामुळे सरकारने आणि राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांचा विषय 6 महिने पुढे ढकलाव्या, अशी विनंती करत आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना म्हटले आहे.

महाविकास आघाडी सरकारवर लोक नाराज आहेत.सोयाबीन गेले, कापूस आणि धान शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. कोरोनामध्ये राज्य सरकारचे काही काम दिसून आले नाही. कोरोना हाताळण्यात सरकार अपयशी ठरलेय, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

आमचा पक्ष राज्यात सत्तेत नसला तरी त्याचा ग्रामंपचायत निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही. आमचा पक्ष कायम निवडणुकीसाठी तयार आहे. मात्र, राज्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलाव्या, असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

राज्य निवडणूक आयोगाने 19 जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यासंदर्भातील अहवाल 21 सप्टेंबरपर्यंत देण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. एप्रिल ते जून महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यावरून राज्यात वाद निर्माण झाला होता.(Chandrashekhar Bawankule demands postpone Grampanchayat elections)

संबधित बातम्या:

कृषीविधेयक तात्काळ रद्द करा; शरद पवार यांची मागणी

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य शासनाचा सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज : अशोक चव्हाण

Bhiwandi building collapse | भिवंडी दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, 24 तासानंतरही बचावकार्य सुरु

(Chandrashekhar Bawankule demands postpone Grampanchayat elections)

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.