AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीस सरकारच्या धनगर समाजासाठीच्या योजना आघाडी सरकारकडून बंद : गोपीचंद पडळकर

भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकासआघाडी सरकारवर धनगरविरोधी असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

फडणवीस सरकारच्या धनगर समाजासाठीच्या योजना आघाडी सरकारकडून बंद : गोपीचंद पडळकर
| Updated on: Dec 11, 2020 | 6:29 PM
Share

मुंबई : भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकासआघाडी सरकारवर धनगरविरोधी असल्याचा गंभीर आरोप केला आहे. आघाडी सरकारने देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने धनगर समाजासाठी सुरु केलेली योजना बंद केल्याचाही आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला. तसेच सरकारने जे आदिवासींसाठी ते धनगरांसाठी या न्यायाने तात्काळ धनगर समाजाला निधी उपलब्ध करुन देत योजना पुन्हा सुरु करावी, अशी मागणी केली (BJP leader Gopichand Padalkar criticize Thackeray Government over Dhangar Schemes and Fund issue).

गोपीचंद पडळकर म्हणाले, “धनगर समाजातील मेंढपाळ बांधवांसाठी फडणवीस सरकारने 2018 मध्ये महाराजा यशवंतराव होळकर महामेष योजना सुरु केली होती. या योजनेत प्रत्येक तालुक्यातील 15-20 युवकांना मेंढ्या दिल्या जायच्या. यासाठी लाभार्थीने 47 हजार रुपये भरल्यानंतर 3 लाख रुपयांपर्यंतच्या शेळ्या आणि मेंढ्या या योजनेतून दिल्या जायच्या. मात्र, आघाडी सरकारच्या काळात मागील वर्षीच्या मागणीधारकांना देखील हा निधी देण्यात आला नाही. या वर्षी देखील या योजनासाठी काहीही तरतूद नाही.”

“या योजनेतून बेरोजगारांना पर्याय मिळाला होता. यामुळे अनेकांना या योजनेचा लाभ झाला. परंतू राज्यात हे महाविकासआघाडीचं सरकार आल्यापासून एकही योजना पुढे कार्यन्वित केली नाही. हे सरकार धनगर समाजाच्या विरोधात भूमिका घेतंय. फडणवीस सरकारने जी 1 हजार कोटी रुपयांची घोषणा केली, त्यावरही पुढे कार्यवाही झाली नाही. त्यावरुन हे सरकार धनगर समाजाच्या विरोधात असल्याचं दिसतंय. यावर सरकारने त्वरित निर्णय घ्यावा आणि महाराजा यशवंतराव होळकर महामेष योजना पुन्हा सुरु करावी,” असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

“ज्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले आहेत त्यांना निधी उपलब्ध करुन द्यावा. 2019-20 चे 1 कोटी आणि 2020-21 चे 1 कोटी निधी द्यावा. जे आदिवासींना ते धनगरांना या प्रमाणे निर्णय घ्यावा. यावर्षी आदिवासींना 8 हजार 853 कोटी रुपये निधी दिला आहे. त्यापटीत धनगरांनाही निधी द्यावा,” अशी मागणीही पडळकरांनी ठाकरे सरकारकडे केली.

हेही वाचा :

शेळ्या-मेंढ्या चारल्या म्हणून गुन्हे दाखल करणं थांबवा : असीम सरोदे

…तर माळी, धनगर, वंजाऱ्यांचं आरक्षण काढून टाका : सराटे

जानकर ते पडळकर… लोकसभेसाठी सर्व धनगर नेते एकवटले!

BJP leader Gopichand Padalkar criticize Thackeray Government over Dhangar Schemes and Fund issue

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.