जानकर ते पडळकर… लोकसभेसाठी सर्व धनगर नेते एकवटले!

जानकर ते पडळकर... लोकसभेसाठी सर्व धनगर नेते एकवटले!

पुणे : धनगर समाजातील वेगवेगळ्या गटातटात विभागलेले नेते आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एकवटण्याची शक्यता आहे. आघाडी किंवा युतीकडून एकही जागा न मिळाल्याने धनगर नेते नाराज आहेत. त्यामुळे सर्व नेते एकत्र येऊन लोकसभा लढवणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मंत्री महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या एबी फॉर्मवर धनगर नेते निवडणूक लढणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. पुण्यात हे सर्व नेते येत्या दोन दिवसात एकत्र येतील आणि पुढील निर्णय घोषित करतील.

अनिल गोटे, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर, उत्तम जानकर, प्रकाश शेंडगे, सुरेश कांबळे असे सर्व धनगर नेते एकत्र येत लोकसभा निवढणूक लढणार असल्याची माहिती मिळते आहे. कुठल्या मतदारसंघांतून कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरेल, हे अद्याप निश्चित झाले नाही. मात्र, पुण्यातील बैठकीत यावरही शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ज्या मतदारसंघात धनगर समाजाची लोकसंख्या प्रभावी आहे, तिथे युती आणि आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

निवडणुकीच्या तारखा जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

लोकसभा निवडणूक : तुमच्यासाठी 5 अत्यंत महत्त्वाच्या बातम्या

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

Published On - 7:55 pm, Sun, 17 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI