अपघातात जखमी झालेल्या ऊसतोड मजुराच्या कुटुंबाचे पंकजा मुंडेंकडून सांत्वन, कुटुंबाला घेतलं दत्तक

| Updated on: Nov 24, 2020 | 8:23 PM

शिरुर तालुक्यातील पाडळी येथील ऊसतोड मजूर गणेश मिसाळ त्यांच्या कुटुंबासोबत सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा कारखान्याला गेले होते. | Pankaja Munde

अपघातात जखमी झालेल्या ऊसतोड मजुराच्या कुटुंबाचे पंकजा मुंडेंकडून सांत्वन, कुटुंबाला घेतलं दत्तक
Follow us on

बीड: राज्यात ऊस गाळीप हंगाम सुरु झाल्यानंतर सध्या बीडमध्ये मोठ्याप्रमाणावर मजूर स्थलांतरित झाले आहेत. यापैकी एका कामगाराचा ऊसतोडणीदरम्यान अपघात झाला होता. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मंगळवारी या ऊसतोड मजुराच्या कुटुंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. तसेच या कुटुंबाची हालाखीची परिस्थिती पाहून पंकजा मुंडे यांना या कुटुंबाला दत्तक घेण्याचाही निर्णय घेतला आहे. (Pankaja Munde helps sugarcane labour family injured in accident)

सध्या बीडमध्ये मोठ्याप्रमाणावर परराज्यातील मजूर आले आहेत. शिरुर तालुक्यातील पाडळी येथील ऊसतोड मजूर गणेश मिसाळ त्यांच्या कुटुंबासोबत सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा कारखान्याला गेले होते. याठिकाणी ऊसतोडणी करताना त्यांचा अपघात झाला.

या अपघातात गणेश मिसाळ हे गंभीर जखमी झाले होते. घरातल्या कर्त्या पुरुषाचे दोन्ही पाय लुळे पडल्याने कुटुंबासमोर गंभीर समस्या निर्माण झाली होती. मात्र, पंकजा मुंडे यांनी घरी जात या कुटुंबाला धीर दिला. तसेच या कुटुंबाला आपण दत्तक घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी पंकजा मुंडे यांनी गणेश मिसाळ यांच्या घरी भोजनही केले.

पाटबंधारे कार्यालयात शेतकऱ्याने स्वतःला पेटवून घेतले

सरकारने जमीन हस्तांतर करुनही मावेजा (मोबदला) न मिळाल्यामुळे व्यथित झालेल्या अर्जुन साळुंके या शेतकऱ्याने बीडच्या पाटबंधारे कार्यालयात शेतकऱ्याने स्वत:ला पेटवून घेतले. अधिकारी चालढकल करत असल्याने शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. या घटनेत अर्जुन साळुंके हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

संबंधित बातम्या:

ऊसतोड मजुरांसाठी कट्टर विरोधक भावंडांमध्ये ‘गोडवा’, पंकजा-धनंजय मुंडे 1 वर्षानंतर एकत्र

पंकजा मुंडेंनी दुसऱ्या कोणाची तरी भाषा बोलू नये; ऊसतोड कामगारांची अवस्था पाहा- प्रकाश आंबेडकर

सुरेश धस ऊसतोड कामगारांना धमकी देताय काय?; पंकजा मुंडेंचा थेट इशारा

(Pankaja Munde helps sugarcane labour family injured in accident)